साईबाबांच्या शिर्डीमध्ये गेल्यावर्षी अनेक महिला अचानक गायब झाल्याची घटना घडली होती. आता महाराष्ट्रातील विदर्भात (Vidarbh) 2019 मध्ये 900 हून अधिक मुली बेपत्ता झाल्या आहेत. माहिती अधिकार कायद्यांतर्गत दाखल केलेल्या अर्जात, ही माहिती उघडकीस आली आहे. आरटीआयमध्ये असे सांगण्यात आले आहे की विदर्भातून 2019 दरम्यान 926 मुली बेपत्ता झाल्या आहेत, ज्याचा पोलिसांना अद्यापपर्यंत शोध लागला नाही.
विदर्भ विभाग, नागपूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, वशिम आणि यवतमाळ या सहा जिल्ह्यांमधून ही आकडेवारी गोळा केली गेली आहे. आरटीआयनुसार वर्ष 2019 मधील हरवलेल्या व्यक्तींमध्ये एक वर्ष ते 35 वर्षे वयोगटातील महिलांचा समावेश आहे, ज्यामध्ये पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली गेली आहे.
गेले अनेक महिने मुलींचा शोध घेण्याचा प्रयत्न चालू आहे, मात्र या प्रकरणात पोलिसांचा हात अद्याप यश आले नाहे. मुलींच्या बेपत्ता होण्याच्या घटनांमुळे पोलिसांच्या महिला सुरक्षेच्या दाव्यावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. या प्रकरणात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मुली नक्की कशा गायब झाल्या, त्यांची तस्करी झाली आहे? किंवा त्यांना विदेशात विकले गेले? वेश्याव्यवसायात ढकलले? का त्या 'लव्ह जिहाद'ला बळी पडल्या अशा अनेक गोष्टी समोर आल्या नाहीत.
विदर्भात एक मोठी मानवी तस्करी करणारी टोळी सक्रिय असल्याचे समजते. जर या टोळीचे हे कृत्य असल्यास, मुलींचा शोध लागण्यास पोलिसांना बरेच प्रयत्न करावे लागतील. या प्रकरणात, पोलिसांच्या निष्क्रिय तपासणी शैलीविषयी असे मूल्यांकन केले गेले आहे की, या महिलांचे मोठ्या प्रमाणात बेपत्ता होणे ही गोष्ट कदाचित पोलिसांची 'उच्च प्राथमिकता' नाही आणि राज्य गृह मंत्रालयाने विशेष तपास पथकाद्वारे (एसआयटी) या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे. (हेही वाचा: चंद्रपूर: मानवी तस्करीचे मोठे रॅकेट उघडकीस; 11 व्या वर्षी अपहरण करून, नऊ वर्षांत 7 वेळा विक्री झालेल्या तरुणीची सुटका)
दरम्यान, याआधी चंद्रपूर (Chandrapur) मध्ये एक मानवी तस्करी मोठे प्रकरण उघडकीस आले होते. एका मुलीचे 11 व्या वर्षी अपहरण करून, गेल्या नऊ वर्षांत तिची तब्बल 7 वेळा विक्री झाल्याची माहिती समोर आली होती. हे मानवी तस्करीचे हे रॅकेट खूप मोठे असल्याचा संशय आहे. हरयाणा पोलिसांनीही या प्रकरणी दहा जणांना अटक केली आहे.