मुंबई महानगरपालिका (Photo Credits: Facebook)

मुंबई महानगरपालिकेच्या नऊ अधिकार्‍यांना आज अन्नातून विषबधा झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. मुंबई महानगरपालिकेच्या बी वॉर्डमधील चार महिला आणि नऊ पुरूष यांना अन्नातून विषबाधा झाली आहे. विषबाधेनंतर त्रास जाणवू लागल्याने त्यांना सुरूवातीला साबु सिद्दीकी आणि नंतर जे. जे. रूग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

बी वॉर्डातील अधिकार्‍यांसोबतच एका कॅंटीन कर्मचार्‍यालाही विषबाधा झाली आहे. एका व्यक्तीची प्रकृती असून अन्य आठ जण स्थिर असल्याची माहिती जे जे रूग्णालयाकडून देण्यात आली आहे. ऑफिस कॅंटिंगच्या जेवणातून दुषित अन्नातून ही विषबाधा झाली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र अद्याप याबाबत अधिक माहिती मिळू शकलेली नाही.

निशांत सुर्यवंशी, कृष्णकांत धनावडे, चंद्रकांत पाटील, तनय जोशी, चंद्रकांत जांभळे, तृप्ती शिर्के, प्रतिक्षा मोहिते, सविता पंडित आणि सुष्मा लोखंडे अशी या अधिकार्‍यांची नावं आहेत. विषबाधेनंतर दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास या अधिकार्‍यांना जेजे रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे.