Scholarship Exam Results 2019: 5 वी आणि 8 वी च्या विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती परीक्षा 2019 चा अंतरिम निकाल जाहीर; puppss.mscescholarshipexam.in वर कसा पहायचा रिझल्ट
Results 2019

5 and 8 th std Scholarship Exam Results 2019:  इयत्ता पाचवी आणि आठवीच्या यंदा शिष्यवृत्तीच्या परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचा अंतरिम  निकाल जाहीर झाला आहे. विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल अधिकृत वेबसाईटवर  उपलब्ध करून देण्यात आला आहे.  विद्यार्थ्यांना हा निकाल www.mscepune.in आणि puppss.mscescholershipexam.in या वेबसाईटवर पाहता येणार आहे.  Update: Scholarship Exam Final Results 2019: 5 वी आणि 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा अंतिम निकाल जाहीर; puppss.mscescholarshipexam.in वर पहा शिष्यवृत्तीधारकांची यादी

कसा पहाल निकाल

  • puppss.mscescholarshipexam.in या वेबसाईट वर उजव्या बाजूला शिष्यवृत्ती निकाल फेब्रुवारी 2019 चा पर्याय आहे.
  • या पर्यायावर तुम्हांला विद्यार्थ्यांचा वैयक्तिक निकाल पाहता येईल. त्यासोबतच शाळांना अंतरिम निकाल या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर रोल नंबर, आईचं नाव एन्टर करून सबमीट करा
  •  स्क्रिनवर तुम्हांला निकाल पाहता येईल.

Scholarship Exam Results (Photo Credits: puppss.mscescholarshipexam.in)

विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करायची असल्यास संबंधित शाळांच्या 'लॉग इन'मध्ये 16 ते 27 मे या कालावधीत ऑनलाइन अर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

गुणपडताळणीच्या प्रत्येक पेपरसाठी 50 रुपये शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरता येतील. कालावधीत प्राप्त झालेल्या अर्जांची गुणपडताळणी केल्यानंतर निकाल 30 दिवसांपर्यंत कळविण्यात येणार आहे. त्यानंतर अंतिम निकाल आणि गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल.