Nanded Oil Mill Blast: नांदेड (Nanded) मधून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. MIDC परिसरातील तिरुमला ऑइल इंडस्ट्रीजला (Tirumala Oil Industries) 1 डिसेंबर रोजी भीषण आग (Fire) लागली होती. या आगीत होरपळलेल्या दोन भावांचा मृत्यू झाला आहे. तसेच या स्फोटात तीन जण जखमी झाले होते. स्फोटानंतर लागलेल्या आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच लाखो रुपयांचे तेल नष्ट झाले. ही घटना सकाळी 11.30 ते दुपारी 12.45 च्या दरम्यान घडली होती.
ऑइल मिलच्या गोदामात झालेल्या स्फोटात कंपनीची काही पत्रे उडून गेली. तसेच तेलाने पेट घेतल्याने मोठ्याप्रमाणात आग भडकली. या घटनेत मिलचा मालक आणि त्याच्या भागीदारांसह पाच जण भाजले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भास्कर कोट्टावार आणि सुधाकर बंडेवार हे मिल भागीदारीत चालवत होते. मिलचा मूळ भूखंड महेश रेखावार यांच्या मालकीचा आहे. स्फोट आणि त्यानंतर लागलेल्या आगीचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे. (हेही वाचा -Andheri Fire: मुंबईत अंधेरी मध्ये 6 मजली इमारतीला आग; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल (Watch Video))
मालक भास्कर प्रल्हाद कोट्टावार, त्यांची मुले हर्षद आणि विनोद कोट्टावार आणि भागीदार सुमित सुधाकर बंडेवार आणि सुधाकर सूर्यकांतराव बंडेवार अशी जखमींची नावे आहेत. सुरुवातीला जखमींवर नांदेड येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले. जखमींपैकी भास्कर कोट्टावार आणि त्यांच्या दोन मुलांसह तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नंतर हैदराबादला हलवण्यात आले. (हेही वाचा - Massive Fire in Dongri: दाक्षिण मुंबई मध्ये डोंगरी भागात रहिवासी इमारती मध्ये भडकली आग (Watch Video))
दरम्यान, हर्षद कोट्टावार यांचा 5 डिसेंबर रोजी मृत्यू झाला, त्यानंतर 6 डिसेंबर रोजी त्याचा भाऊ विनोद यांचा मृत्यू झाला. भास्कर कोट्टावार अजूनही उपचार घेत आहेत. स्फोट आणि आगीमुळे औद्योगिक परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. रविवारच्या सुट्टीमुळे कामगार त्यावेळी उपस्थित नव्हते, त्यामुळे मोठी जीवितहानी टळली.