महाराष्ट्राला कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) तावडीतून सोडविण्यासाठी अहोरात्र झटणारे अनेक कोविड योद्धा (COVID Warriors) म्हणजेच महाराष्ट्र पोलिस (Maharashtra Police) मात्र कोरोनाच्या जाळ्यात अडकत चालले आहे. पोलिस विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत 147 पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून कोरोना बाधित पोलिसांची एकूण संख्या 11,920 वर पोहोचली आहे. यात सद्य परिस्थितीत 2227 पोलिसांवर उपचार सुरु आहेत. तसेच आतापर्यंत 124 पोलिस दगावल्याची माहितीही पोलिस विभागाने दिली आहे.
यात दिलासादायक गोष्ट म्हणजे आतापर्यंत 9,569 पोलिसांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात करुन पुन्हा कामावर रुजू झाले आहेत. Coronavirus In Maharashtra Police: महाराष्ट्र पोलिस दलात मागील 24 तासांत 381 जणांना कोरोनाची लागण; 3 जणांचा मृत्यू
147 more policemen found #COVID19 positive in the last 24 hours in Maharashtra, taking the tally to 11,920, including 2,227 active cases, 9,569 recovered cases & 124 deaths of police personnel in the state till date: Maharashtra Police pic.twitter.com/ua4w6pI47y
— ANI (@ANI) August 14, 2020
महाराष्ट्र पोलिस विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे उल्लंघन करणा-या 2,28,076 लोकांवर पोलिसांनी IPC 188 अंतर्गत गन्हा दाखल केला आहे.
राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 5 लाख 60 हजार 126 इतकी झाली आहे. तर आतापर्यंत 19,063 रुग्णांची रुग्णांची कोरोनाविरुद्धची झुंज अयशस्वी ठरली आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. तर भारतामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा आता 24 लाख 60 हजारांच्या पार गेला आहे. दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आता 24 तासांत नव्या 64,553 रूग्नांना कोरोनाची लागण झाली आहे. तर सुमारे 1007 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. भारतामध्ये सध्या 6,61,595 जणांवर कोविड 19 साठी उपचार सुरू आहेत.