आईपासून दूर गेलेल्या दोन चिमुकल्या बिबट्याच्या बछड्यांना पुन्हा जंगलात आईजवळ आणण्यामध्ये महाराष्ट्र वनविभाग आणि प्राणी प्रेमी संघटनांना यश आलं आहे. जुन्नरच्या वडगाव आनंद (Vadgaon Anand village) आणि गोळेगाव (Golegaon village in Junnar) गावातून अवघ्या 10 आणि 13 आठवड्यांच्या दोन बिबट्यांच्या बछड्यांची सुटका करण्यात आली आहे. स्थानिकांच्या मदतीने या बछड्यांना सोडवण्यास मदत झाल्याची माहिती देण्यात आली आहे. हा प्रकार 11 मार्चचा असल्याचं सांगण्यात आलं आहे.
#Maharashtra: Maharashtra Forest Department and Wildlife SOS rescued a 10-week-old leopard cub & a 13-week-old leopard cub from Vadgaon Anand village and Golegaon village in Junnar, on 11th March. Later, the cubs were reunited with their mothers. pic.twitter.com/6otfTfHHJF
— ANI (@ANI) March 13, 2019
एकीकडे वन्य जीव आणि मनुष्यप्राणी एकमेकांच्या वस्तीमध्ये आल्याने हल्ला होण्याचं प्रमाण वाढल आहे. काही दिवसांपूर्वी ठाण्याच्या कोरम मॉल परिसरामध्ये बिबट्या आल्याने स्थानिकांमध्ये दहशत पसरली होती.