Horoscope Today आजचे राशीभविष्य, बुधवार 06 सप्टेंबर 2023: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
राशी भविष्य- (फोटो सौजन्य- फाइल इमेज)

Horoscope Today 06 Sep 2023 in Marathi: आजचे राशीभविष्य, बुधवार 06 सप्टेंबर 2023 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल, कोणत्या राशींच्या व्यक्तींचे चमकणार नशीब, कोणाला हा दिवस ठरणार शुभ तर कोणाला अशुभ, जाणून घ्या बुधवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.

मेष (Aries Horoscope Today): आज तुम्हाला डोक शांत ठेवून विचारपूर्वक कृती करणे आवश्यक आहे. आर्थिक व्यवसायात पैशांचे व्यवहार जपून करा. त्वरित कोणावरही विश्वास ठेऊ नका. घरातील वयोवृद्धांचा मान राखा. थोडा अशक्तपणा वाटेल पण आराम केल्यास उत्साहित व्हाल.

शुभ उपाय- शंकराची पूजा करा.

शुभ दान- अन्नदान करा.

शुभ अंक- 9

शुभ रंग- केशरी

वृषभ (Taurus Horoscope Today): आजचा दिवस वृषभ राशीतील व्यक्तींशी उत्तम असणार आहे. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. प्रिय व्यक्तीकडून आनंदाची बातमी कळेल. घरातील मंडळींशी आदराने वागा.

शुभ उपाय- पक्षांना दाणा-पाणी घाला.

शुभ उपाय- देवाला केशर दुधाचा नैवेद्य दाखवा.

शुभ दान- गरजूंना आर्थिक मदत करा.

शुभ अंक- 7

शुभ रंग- गुलाबी

मिथुन (Gemini Horoscope Today): खूप दिवसांपासून अडकलेली कामे पूर्णत्वास घेऊन जाण्यास आज मदत मिळेल. कामात घाईगडबड न करता कामे पूर्ण कशी होतील याकडे जास्त लक्ष द्या. प्रिय व्यक्तीशी आदराने वागा. आई-वडिलांची साथ लाभेल. नोकरीच्या ठिकाणी सावधगिरीने वागा.

शुभ उपाय- खडीसाखर खाऊन बाहेर पडा.

शुभ दान- तांदूळ दान करा.

शुभ अंक- 8

शुभ रंग- पांढरा

कर्क (Cancer Horoscope Today): कर्क राशीतील व्यक्तींना आजचा दिवस सुखाचा आणि समृद्धीचा जाणार आहे. कामात यश मिळून तुमचे कौतुक केले जाईल. प्रिय व्यक्ती तुमच्यावर आज खुप खूश असेल. आई-वडिलांची साथ लाभेल.

शुभ उपाय- काळे तीळ पाण्यात सोडा.

शुभ दान- गरीबांना अंथरुण दान करा.

शुभ अंक- 6

शुभ रंग- करडा

सिंह (Leo Horoscope Today): बेरोजगारांना घरापासून लांब ठिकाणी नोकरीच्या संधी येतील. अधिकारी वर्गास कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल. दुकानदारांनी उधारी उसनवारी टाळावी. व्यावसायिकांनी जपून व्यवहार करावे.

शुभ उपाय- घरात धुपबत्ती करुन पूजा करा.

शुभ दान- शक्य असल्यास रक्तदान करा.

शुभ अंक- 4

शुभ रंग- निळा

कन्या (Virgo Horoscope Today): कन्या राशीतील व्यक्तींनी आर्थिक योजनांमध्ये पैसे गुंतवण्यास उत्तम दिवस. आज महत्वाच्या घरगुती प्रश्नांत वडीलधाऱ्यांचे मत अवश्य घ्या. कोणत्याही बाबतीत अतिआक्रमकता नुकसानास कारणीभूत ठरेल. कायद्याची चौकट मोडणे महागात पडू शकते.

शुभ उपाय- मंदिरात तेलाचा दिवा लावा.

शुभ दान- ब्राम्हणाला दक्षिणा द्या.

शुभ अंक- 3

शुभ रंग- क्रिम कलर

तुळ (Libra Horoscope Today): तुळ राशीतील व्यक्तींनी खाण्यावर नियंत्रण ठेवा. घरातील मंडळींचे विचार पटणार नाहीत. परंतु त्या विचारांचे पालन करुन योग्य ती कृती करा. मित्र मंडळीची गाठभेट होण्याची शक्यता आहे.

शुभ उपाय- घरात लक्ष्मीच्या पावलांची पूजा करा.

शुभ दान- कुत्र्याला जेवण द्या.

शुभ अंक- 1

शुभ रंग- पिवळा

वृश्चिक (Scorpio Horoscope Today): या राशीच्या व्यक्तींना आज कंबर दुखी किंवा मानदुखीचा त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे असे झाल्यास दुर्लक्ष करु नका. अचानक खर्च वाढू शकतो. घरात थोडे वादाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता. विश्वासू मित्रांकडून दगा होऊ शकतो.

शुभ उपाय- देवाला चाफ्याच्या फुलांचा हार घाला.

शुभ दान- लाल रंगाचे वस्रदान करा.

शुभ अंक- 2

शुभ रंग- जांभळा

धनु (Sagittarius Horoscope Today): कार्यक्षेत्रात काही मनाविरूध्द घटना घडण्याची शक्यता आहे. मात्र त्यावर त्वरित प्रतिक्रिया देणे टाळा. गोष्टी समोरच्याच्या कलाने घ्या. नातेसंबंधांमध्ये गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. जोडीदाराचे मन सांभाळा.

शुभ उपाय- सकाळी उठल्यावर देवाचे नामस्मरण करा.

शुभ दान- गरजूला उडीद, मूग आणि तूर डाळ दान करा.

शुभ अंक- 6

शुभ रंग- लाल

मकर (Capricorn Horoscope Today): आजचा दिवस तुम्हाला आनंदात घालवता येणार आहे. मित्रपरिवारासह वाद घालणे टाळा. प्रिय व्यक्तीकडून आनंदाची बातमी मिळेल. आई-वडिलांकडून साथ लाभेल.

शुभ उपाय- जेवल्यानंतर गुळ खा.

शुभ दान- गरजूंना पांढऱ्या रंगाचे वस्रदान करा.

शुभ अंक- 1

शुभ रंग- पोपटी

कुंभ (Aquarius Horoscope Today): आजचा दिवस मिश्र असेल. आरोग्याकडे लक्ष द्या. वादविवाद-चर्चा करू नका. आर्थिक बाबीवर व्यवस्थित योजना बनवू शकाल. मात्र काही काळानंतर या योजना अमलात आणा. आकस्मिक धनलाभ होण्याची शक्यता आहे. जोडीदाराचा सल्ला फायदेशीर ठरेल.

शुभ उपाय- गायत्री मंत्राचा जप करा.

शुभ दान- गरजूला धातूचे दान करा.

शुभ अंक- 4

शुभ रंग- हिरवा

मीन (Pisces Horoscope Today): आजच्या दिवशी मीन राशीतील व्यक्तींसाठी आजचा दिवसाची सुरुवात उत्तम होणार नाही. परंतु काळजीपूर्वक कामे केल्यास चुका होण्याची शक्यता टळेल. आई-वडिलांच्या प्रकृतीकडे लक्ष द्या. जिभेवर ताबा ठेवल्यास जोडीदाराची उत्तम साथ लाभू शकते.

शुभ उपाय- घरातून बाहेर पडताना थोडे काळे तीळ खिशात बाळगा.

शुभ दान- मंदिरात तेलाचे दान करा.

शुभ अंक- 8

शुभ रंग- पांढरा