World Environment Day 2022 Theme: 5 जूनला यंदा जागतिक पर्यावरण दिन कोणत्या थीम वर होणार साजरा?
WED 2022| PC: PIxabay.com

विश्वात अब्जावधी आकाशगंगा आहेत, आपल्या आकाशगंगेत अब्जावधी ग्रह आहेत, पण ‘फक्त एक पृथ्वी’आहे. आणि यंदा याच ‘Only One Earth’ थीम वर जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जाणार आहे. United Nations Environment Programme कडून दरवर्षी 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. 1973 पासून सुरू झालेली ही परंपरा आजही सुरू आहे.

‘Only One Earth’ या थीमच्या अनुषंगाने निसर्गाशी एकरूपतेने जगणे आवश्यक असल्याचा संदेश दिला जाणार आहे. पृथ्वीच्या संरक्षणासाठी आपण जागतिक स्तरावर पृथ्वीच्या संरक्षणासाठी, तिच्या रिस्टोअर साठी आणि तिला सेलिब्रेट करण्यासाठी काय प्रयत्न करायला हवेत यासाठी जागृती करण्याचं आवाहन करण्यात आले आहे.

1972 Stockholm Conference मध्ये “Only One Earth” ची घोषणा करण्यात आली होती. आज 50 वर्षांनंतरही तिचं महत्त्व तितकंच आहे. 1972 मध्ये स्टॉकहोममधील पर्यावरणावरील संयुक्त राष्ट्रांची परिषद पर्यावरण हा प्रमुख मुद्दा बनवणारी पहिली जागतिक परिषद होती.

UN कडून आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यावरणाच्या प्रसारासाठी सर्वात मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते. जगभरातील लाखो लोक पृथ्वीच्या संरक्षणासाठी काम करत आहेत. Happy World Environment Day Wishes: जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा! Quotes, Whatsapp Status द्वारे खास संदेश देऊन करा जाणीवजागृती .

2022 हा जागतिक पर्यावरणासाठी काम करणार्‍यांकरिता  एक ऐतिहासिक मैलाचा दगड आहे कारण 1972 च्या संयुक्त राष्ट्रांच्या मानवी पर्यावरण परिषदेला 50 वर्षे पूर्ण होत आहेत, ज्याला पर्यावरणावरील पहिली आंतरराष्ट्रीय बैठक म्हणून मोठ्या प्रमाणावर पाहिले जाते.