विठ्ठल रूक्मिणीच्या पूजा (Vitthal Rukmini Puja) वाटपामध्ये गैर प्रकार होत असल्याच्या तक्रारींनंतर आता भाविकांना पूजेसाठी ऑनलाईन बुकिंगची व्यवस्था सुरू होत आहे. मंदिर प्रशासनाच्या माहितीनुसार, भाविकांना आता ऑनलाईन बुकिंगची सोय 1 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. विठ्ठल रूक्मिणीच्या सार्या पूजा आता थेट ऑनलाईन पद्धतीने बूक करता येणार आहे. त्यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या नित्यपूजा, पाद्यपूजा, तुळशी पूजा, चंदन उटी पूजा याची नोंदणी आता ऑनलाईन सुरू होईल.
विठ्ठल रूक्मिणीच्या पूजेसाठी 1 सप्टेंबर पासून ही ऑनलाईन प्रक्रिया सुरू होणार होती पण त्याच्याशी संबंधित कामाला वेळ लागल्याने ही प्रक्रिया महिनाभर उशिराने सुरू होत आहे. नक्की वाचा: Robbery in Vitthal Mandir: विठ्ठल- रूक्मिणीचं दर्शन घेतल्यानंतर देवाचाच मुकूट चोरला; चोरी सीसीटीव्हीत कैद .
विठ्ठल रूक्मिणी हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. मात्र त्याच्या सेवेमध्ये असलेल्यांना काही तक्रारी होत्या. मागील अनेक दिवसांपासून गरजू भाविकांना इच्छा असूनही विठ्ठल रूक्मिणीची पूजा करता येत नव्हती. देवाच्या पूजेत सुसूत्रता आणण्याच्या उद्देशाने आता खास संगणक प्रणाली सुरू करण्यात आली आहे.त्यानुसार ऑनलाईन बुकिंगची सोय असणार आहे.