Latest Mehndi Design For Eid ul-Fitr 2024: मेहंदीच्या अनोख्या डिझाईन्स हातावर काढून सणाचा आनंद करा द्विगुणीत
Ramzan Eid 2024 Latest Mehndi Design

 Latest Mehndi Design For Eid ul-Fitr 2024: ईदचा सण रमजानच्या पवित्र महिन्याच्या समाप्तीस चिन्हांकित करतो, जो हिजरी कॅलेंडरच्या 10 व्या महिन्याच्या शव्वालच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो, रमजान ईद ही ईद-उल-फितर, ईद-उल-फित्र आणि मेथी ईद म्हणूनही ओळखली जाते. मात्र, ईदच्या आदल्या रात्री जगभरात ईदचा चंद्र दिसतो. चांद रात्रीला चंद्र दिसल्यानंतर लोक चांद रात आणि ईद मुबारकच्या शुभेच्छा देण्यात सुरुवात करतात. अर्थात, ईदची तयारी अनेक दिवस आधीच सुरू होते; हा दिवस साजरा करण्यासाठी लोक भरपूर खरेदी करतात. नवीन कपड्यांपासून ते वैयक्तिक ग्रूमिंगपर्यंतच्या गोष्टींवर महिलांचे विशेष लक्ष असते. यासोबतच या सणाच्या सेलिब्रेशनमध्ये भर घालण्यासाठी मेहंदीच्या सुंदर डिझाईन्स हातातवर काढले जातात. ईद-उल-फित्र साजरी करण्यासाठी, महिला त्यांच्या हात आणि पायांवर सुंदर मेहंदी डिझाइन लावतात. आम्ही तुमच्यासाठी ईद-उल-फित्रसाठी नवीन आणि अनोखे मेहंदी डिझाइन आणले आहेत, ज्या तुम्ही काढू शकता.

पाहा खास मेहेंदी डिझाईन:

रमजानच्या शेवटच्या दिवशी चंद्र दिसल्यानंतर दुसऱ्या दिवशी ईदचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. लोक नवीन कपडे घालतात आणि सकाळी नमाज अदा करतात, नंतर एकमेकांना अभिनंदन करतात. ईदच्या दिवशी गोड शेवया आणि स्वादिष्ट पदार्थ तयार केले जातात आणि गरिबांना दान देखील केले जाते.