Dead Body | Image used for representational purpose (Photo Credits: Pixabay)

Valsad Express Blast: श्रमिक एक्सप्रेस सोमवारी वलसाडहून आली होती आणि मुझफ्फरपूर स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवर उभी होती. दरम्यान, काही कारणास्तव एका एसी बोगीला आग लागली. आग विझवण्याचा प्रयत्न सुरू असतानाच स्फोट झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

 आग विझवण्याच्या यंत्राचा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेत आरपीएफ जवान विनोद कुमार यांचा मृत्यू झाला. आराह जिल्ह्यातील इमादपूर पोलिस स्टेशनच्या मोआप खुर्द मिस्की टोला येथील रहिवासी विनोद कुमार हे दोन वर्षांपासून जंक्शनवर तैनात होते. ते पत्नीसह भाड्याच्या खोलीत राहत होते.

माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला. घटनास्थळी पोहोचलेले रेल्वे आयजी अमरेश कुमार यांनी सांगितले की, एफएसएलची टीम पोहोचली असून तपास करत आहे. आग विझवताना आरपीएफ जवानाचा मृत्यू झाला आहे.