Uttarakhand: होळी साजरी केल्यानंतर गंगा नदीत बुडून दोघांचा मृत्यू
प्रतिकात्मक प्रतिमा (Image Courtesy: Archived, Edited, Symbolic Image)

Uttarakhand: उत्तराखंडमधील टिहरी गढवाल जिल्ह्यात होळी साजरी करून गंगा नदीत आंघोळीसाठी गेलेल्या तिघांपैकी दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले तर अन्य एकाचा बुडून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी मंगळवारी ही माहिती दिली. टिहरीचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक (एसएसपी) नवनीत सिंह भुल्लर यांनी सांगितले की, सोमवारी ऋषिकेशच्या मुनी की रेती भागात ही घटना घडली.

एसएसपी म्हणाले की, निखिल (28, रा. पंजाब) आणि सुरेंद्र नेगी (37, रा. टिहरी) यांचे मृतदेह सापडले आहेत. ते म्हणाले की, हरियाणातील अक्षय (२५) याचा राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या जवानांकडून शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.