महाराष्ट्र अर्थसंकल्प 2020-21 । Photo Credits: Twitter

नुकताच महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi) पहिला अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2020) सादर केला.ठाकरे सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प असून यात काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अर्थसंकल्प विधानसभेत मांडला होता. यात महिला सुरक्षा, शेतकऱ्यांची कर्जमाफीसह बरेच महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. याशिवाय क्रीडा विभागाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वपूर्ण असे निर्णय घेतले आहेत. महाराष्ट्र हे प्रतिभावंत क्रीडापटू घडणवारे राज्य आहे. यामुळे या अर्थसंकल्पात क्रीडा विभागाला मिळणाऱ्या निधीत वाढ करण्याचा ठाकरे सरकारने निर्णय घेतला होता. याआधी राज्यातील प्रत्येक जिल्हा क्रीडा संकुलासाठी 8 कोटींचा निधी खर्च करण्यात येत होता. या निधीत वाढ केली असून आता क्रिडा विभागाला 25 कोटींचा निधी देण्यात येणार आहे.

महाराष्ट्रात उत्तम असे खेळाडू तयार होतात. तसेच हे खेळाडू राज्य आणि आंतराष्ट्रीय स्तरावर जाऊन महाराष्ट्राचे मोठे करतात. त्यामुळे क्रीडा विभागाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वपूर्ण असे निर्णय घेतले गेले आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्हा क्रीडा संकुलासाठी रूपये 25 कोटी इतका निधी देण्यात येणार आहे. हा निधी यापूर्वी केवळ 8 कोटींचा होता. त्यात वाढ करण्यात आली आहे. हे देखील वाचा- सरकारी कर्मचाऱ्यांची खाती ऍक्सिक बँकेत वळवल्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई उच्च न्यायालयाची नोटीस

क्रिडा विभागासाठी घेतलेले महत्वाचे निर्णय-

- पुण्याच्या बालेवाडीत आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ सुरू करण्यात येणार.

- कबड्डी, कुस्ती आणि खो-खो या क्रीडाप्रकारांच्या स्पर्धांच्या आयोजनासाठी 75 लाख रुपयांचा निधी

- पुण्यात ऑलिम्पिक भवन बनवण्याचीही ठाकरे सरकारची घोषणा.

- व्हॉलिबॉल स्पर्धांच्या आयोजनासाठी 75 लाखांचा निधी देण्यात येणार.

याशिवाय, राज्याच्या अर्थसंकल्पात अजित पवार यांनी अजित पवार यांनी आमदारांच्या निधीत एक कोटींची वाढ केली आहे. मुद्रांक शुल्कात एक टक्का सूट जाहीर करत अजित पवार यांनी गृह खरेदीदारांना मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच अर्थसंकल्पात महिलांसाठी मोठी घोषणा, प्रत्येक जिल्ह्यात महिला पोलीस स्टेशन उभारणार येणार आहे. तर, 2 लाखांवर कर्ज असणाऱ्यांनाही दिलासा देणार, नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन निधी देण्यात येणार आहे.

ठाकरे सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात अजित पवार यांनी सर्वच क्षेत्रांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, बजेटच्या अखेरीस वाहनचालकांचा खिशाला कात्री लावणारी घोषणा करण्यात आली असून पेट्रोल-डिझेलच्या दरात एका रुपयाची वाढ करण्याचे अजित पवारांनी जाहीर केले.