सरकारी कर्मचाऱ्यांची खाती ऍक्सिक बँकेत वळवल्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई उच्च न्यायालयाची नोटीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Photo Credits PTI)

सरकारी कर्मचाऱ्यांची खाती ऍक्सिक बँकेत वळवल्याप्रकरणी (Axis Bank Salary Accounts) माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह राज्याच्या मुख्य सचिवांनाही मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) नोटीस पाठवली आहे. या नोटीसमध्ये देवेंद्र फडणवीसांना आठ आठवड्यात उत्तर देण्यास बजावले आहे. मोहनीश जबलपुरे (Mohanish Jabalpur) यांनी फडणवीसांविरोधात न्यायालयात याचिका दाखल करुन, त्यांच्यावर पदाचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) ऍक्सिस बँकेच्या उपाध्यक्ष आणि पश्चिम भारताच्या कॉर्पोरेट प्रमुख आहेत. या हस्तांतरणाचा फायदा  ऍक्सिस बँके ला झाला. मात्र, स्टेट बँकेला मोठा तोटा सहन करावा लागला, असा दावाही जबलपुरे यांनी केला.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस या ऍक्सिस बॅंकेत कार्यरत आहेत. त्यामुळे पत्नीला बॅंकिग क्षेत्रात नावलौकिक मिळवून देण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांची खाती ऍक्सिस बॅंकेत वळती करण्यात आल्याचे याचिकेत नमूद केले आहे. गृहमंत्रालय अंतर्गत येणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची खाती , संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांची खाती आणि मंत्रालयीन घोटाळ्याची खाती देवेंद्र फडणवीस यांनी एक्सिस बॅंकेत वळवली होती. यामुळे या घोटाळ्याचे चोकशी करुन राज्य सरकारला कारवाईचे आदेश देण्यात यावे, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायायालयाने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्याचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, अतिरिक्त पोलीस महासंचालक यांना प्रतिवादी करुन नोटीस बजावली आहे. तसेच येत्या आठ दिवसाच्या आत फडणवीस यांना उत्तर देण्याचे आदेश दिले आहे. हे देखील वाचा- मुंबई: सायन उड्डाणपूल 6-9 मार्च दरम्यान वाहतुकीसाठी बंद

ऍक्सिस बँक ही देशातील एक जबाबदार बँकिंग आणि वित्तीय संस्था आहे. सैन्य आणि पोलिस या दोन्ही गणवेशधारक दलांची सेवा करणे हे ऍक्सिस बँकेचं लक्ष्य तर आहेच, पण अभिमानास्पद बाबही आहे. आम्ही देश आणि राज्यांमध्ये गुंतवणूक करत राहू’ असे ऍक्सिस बँकेचे कार्यकारी संचालक राजेश दहिया यांनी पत्रक काढून म्हटले होते.