Eknath Shinde | (Photo Credit- X)

महाराष्ट्रात एकतर्फी यश खेचून आणत महायुतीने आपलं सरकार स्थापन केलं आहे. आता भाजपाचं लक्ष्य दिल्ली विधानसभा निवडणूकांकडे (Delhi Assembly Elections) लागलं आहे. दिल्लीमध्ये 5 फेब्रुवारीला विधानसभा निवडणूका होणार आहे. या निवडणूकीत शिवसेना थेट रिंगणात उतरणार नसली तरीही आपला पठिंबा भाजपाला असेल असे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जाहीर केले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी पत्राद्वारे आपली भूमिका जाहीर केली आहे. Shiv Sena Delhi unit chief Sandeep Chaudhary यांनी BJP Delhi unit president Virendra Sachdeva यांच्याकडे आपल्या पाठिंब्याचे पत्र दिले आहे.

तीन दशकांहून अधिक काळ, शिवसेना-भाजप युती हिंदुत्व आणि सुशासनाचं समर्थन करत भारतीय राजकारणात एक शक्तिशाली शक्ती म्हणून एकत्र आहेत.

दिल्लीत आप आणि कॉंग्रेस विरूद्ध भाजपाची लढाई

दिल्लीत भाजपाची लढाई अरविंद केजरीवाल यांच्या आप आणि कॉंग्रेस पक्षाविरूद्ध आहे. सध्या दिल्लीमध्ये आपचं सरकार आहे. 1998 साली सुषमा स्वराज या दिल्लीच्या शेवटच्या भाजपाच्या मुख्यमंत्री होत्या. त्यांच्यानंतर 15 वर्ष कॉंग्रेसच्या शीला दीक्षित आणि त्यांच्यानंतर 2013 पासून 2 टर्म आप कडे दिल्लीची सत्ता आहे.

दिल्ली विधानसभेच्या 70 जागा आहेत. यासाठी  5 फेब्रुवारीला मतदान आणि 8 फेब्रुवारीला त्याचे निकाल जाहीर केले जाणार आहेत. सध्या दिल्लीत विधानसभेसाठीचा प्रचार अंतिम टप्प्याच्या दिशेने सुरू झाला आहे.