दूधसागर धबधब्याकडे (Dudhsagar Waterfalls) जाण्यास रेल्वे पोलीस (Railway Police) आणि वन खात्याने बंदी घातली असून त्या बद्दल रेल्वेमध्ये पोलिसांच्याकडून घोषणा केली जात आहे. दूधसागर धबधबा दक्षिण गोव्यातील धारबांदोडा तालुक्यातील कुळे येथे हा दूधसागर धबधबा आहे. दूधसागर धबधब्यावर जाण्यासाठी रेल्वे मार्गाच्या बाजूने चालत जावे लागते. दूधसागर धबधबा येथे अतिउत्साही पर्यटकांना मागच्या वर्षी प्राण गमवावे लागले होते. त्यामुळे पोलीस प्रशासन आणि वनविभागाने या धबधब्यावर जाण्यास पर्यटकांवर बंदी घातली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचं प्रशसानाकडून सांगण्यात येत आहे. (हेही वाचा - Maharashtra weather Update: आजही राज्यात पावसाचा जोर कायम, 'या' भागांना हवामान खात्याकडून ऑरेंज अर्लट)
यावर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पर्यटकांना दूधसागर धबधब्याकडे जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. कोणी प्रवासी तेथे उतरल्यास रेल्वेच्या कलम 147 नुसार कारवाई करण्यात येईल असे रेल्वे पोलीस सांगण्यात येत आहे. शनिवारी आणि रविवारी हा धबधबा पाहण्यासाठी कर्नाटक,महाराष्ट्र आणि गोव्यातून हजारो पर्यटक येतात. त्यामुळे मागील रविवारी धबधबा पाहायला निघालेल्या पर्यटकांना रेल्वे स्थानक परिसरात रोखून धरले होते. पण बंदी घातली असताना काही पर्यटकांनी धबधब्याकडे जाण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा रेल्वे प्रशासनाकडून त्यांना उठाबशा काढण्याची शिक्षा देण्यात आली होती.
परंतू या बंदीमुळे आता पर्यटकांना दूधसागर धबधब्याचा अनुभव घेता येणार नाही. त्यामुळे शनिवारी आणि रविवारी दुधसागरला भेट देण्यास इच्छुक असलेल्या पर्यटकांमध्ये नाराजी देखील पाहायला मिळत आहे. तसेच पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने हे पाऊल उचलव्याचं पाहायला मिळत आहे. तसेच जर कोणी या धबधब्यावर जाण्याचा प्रयत्न केला तर त्या व्यक्तीवर कठोर कारवाई देखील करण्यात येणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.