Raja Raghuvanshi Murder Case: राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपींना मिळाला 7 दिवसांचा ट्रान्झिट रिमांड; Transit Remand म्हणजे काय? जाणून घ्या

राजा रघुवंशी हत्या प्रकरणात शिलाँग पोलिसांना आकाश राजपूत, विशाल सिंग चौहान आणि राज सिंग कुशवाह या तीन आरोपींना 7 दिवसांचा ट्रान्झिट रिमांड मिळाला आहे.

Raja Raghuvanshi Murder Case: राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपींना मिळाला 7 दिवसांचा ट्रान्झिट रिमांड; Transit Remand म्हणजे काय? जाणून घ्या
Raja Raghuvanshi Murder Case (फोटो सौजन्य - ANI)

Raja Raghuvanshi Murder Case: मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या राजा रघुवंशी यांच्या हत्येप्रकरणी (Raja Raghuvanshi Murder) पोलिसांनी त्यांची पत्नी सोनमसह 4 जणांना अटक (Arrest) केली आहे. राजा रघुवंशी हत्या प्रकरणात शिलाँग पोलिसांना आकाश राजपूत, विशाल सिंग चौहान आणि राज सिंग कुशवाह या तीन आरोपींना 7 दिवसांचा ट्रान्झिट रिमांड मिळाला आहे. तथापि, शिलाँग पोलिसांनी गाजीपूर गाठून सोनमला अटक केली आहे. आता सोनमसह 3 आरोपींना ट्रान्झिट रिमांड मिळाला आहे. अशा परिस्थितीत, अनेकांना ट्रान्झिट रिमांड म्हणजे काय? असा प्रश्न पडला आहे.

ट्रान्झिट रिमांड म्हणजे काय?

ट्रान्झिट रिमांड हा एक प्रकारचा न्यायालयाचा आदेश आहे. जेव्हा पोलिसांना अटक केलेल्या आरोपीला ताब्यात घेऊन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जायचे असते, तेव्हा न्यायालयाची परवानगी मागितली जाते. सोप्या शब्दांत सांगायचे तर, आरोपीला एका राज्यातून दुसऱ्या राज्यात घेऊन जाण्यासाठी ट्रान्झिट रिमांड आवश्यक असतो. (हेही वाचा - Indore Couple Missing Case: शिलॉंगला हनिमूनसाठी जाऊन गायब झालेल्या जोडप्यामध्ये पती Raja Raghuvanshi च्या खूनाचा संशय Sonam Raghuvanshi वर; 'सुपारी दिल्याच्या' आरोपाखाली अटक)

राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपींना मिळाला 7 दिवसांचा ट्रान्झिट रिमांड - 

ट्रान्झिट रिमांडसाठी न्यायालयाची मान्यता आवश्यक -

ट्रान्झिट रिमांडसाठी न्यायालयाची मान्यता आवश्यक आहे. ही मंजुरी आरोपीला अटक केलेल्या न्यायालयाकडून दिली जाते. न्यायालयाकडून ट्रान्झिट रिमांड देताना, आरोपीला कायद्यानुसार अटक करावी लागते. तसेच आरोपीच्या अधिकारांचे उल्लंघन होऊ नये, असेही ठरवले जाते. सहसा ट्रान्झिट रिमांड 1 ते 3 दिवसांसाठी असतो, जेणेकरून तपासानंतर पोलिस आरोपीला पुन्हा न्यायालयात हजर करू शकतील.

मेघालयात इंदूरमधील राजा आणि सोनम रघुवंशी दाम्पत्य बेपत्ता झाल्याची बातमी समोर आली. त्यानंतर राजा रघुवंशीची हत्या करण्यात आली. या प्रकरणी शिलाँगमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. अशा परिस्थितीत, मेघालय पोलिस उत्तर प्रदेशातील गाजीपूर येथून अटक केलेल्या सोनम रघुवंशीला शिलाँगला घेऊन जाण्यासाठी आले आहेत. सोनमला गाजीपूरहून पटनामार्गे शिलाँगला नेण्यात येईल. सोनमची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी मेघालय पोलिस रवाना झाले आहेत.

(The above story first appeared on LatestLY on Jun 09, 2025 08:36 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).