Accident (PC - File Photo)

Bus Accident In Shirdi :  शिर्डितून  एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 40 विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एका खासगी बसचा भीषण अपघात झाला आहे. राज्यात अनेक ठिकाणी अपघाताची मालिका सुरु आहे. शिर्डीतील या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.  शिर्डीजवळील पिंप्री निर्मळ गावाजवळील टोलनाक्यावर हा अपघात झाला आहे.  सुत्राकंडून मिळालेल्या माहितीनुसार, या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. सर्व विद्यार्थी सुखरुप असल्याची माहिती मिळाली आहे.

या अपघाताची माहिती मिळताच नगर येथील लोणी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतला. सर्व विद्यार्थांना अपघात ग्रस्त बसमधून बाहेर काढले. औरंगबाद जिल्ह्यातील एका क्लासेच्या ४० विद्यार्थ्यांसह सहा शिक्षकही या बसमध्ये होते. भंडारदरा येथे पर्यटनासाठी आलेले असताना परतीच्या प्रवास करताना ही घटना घडली. मध्य रात्री अचनाक बसचा मागचा टायर फुटल्याने बसचा अपघात झाला. बस टोलनाक्यावर येवून आढळली.

पोलिसांना ही माहिती मिळताच, घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सर्व विद्यार्थ्यांना अपघात ग्रस्त बसमधून बाहेर काढले. दरम्यान अपघातात काही मोजक्या विद्यार्थांना किरकोळ मार लागला आहे ़. पोलिसांनी त्यांना जवळच्या दवाखानात नेलं आहे. अपघात झाल्याने बसचा दरवाजा बंद झाला. पोलीसांनी घटनास्थळी आल्यावर सर्वांना तेथून बाहेर काढले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवीत हानी झालेली नाही.