IndiGo Flight Emergency Landing: इंधनाच्या कमतरतेमुळे 'मेडे कॉल'नंतर इंडिगोच्या विमानाचे बेंगळुरूमध्ये आपत्कालीन लँडिंग

बेंगळुरू येथील एटीसीने तातडीने ग्राउंड टीमला सूचना दिली, ज्यांनी आपत्कालीन लँडिंगची तयारी केली. विमान रात्री 8:15 वाजता सुरक्षितपणे उतरले. सूत्रांनी पुष्टी केली की, सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स सुरक्षित आहेत.

IndiGo Flight Emergency Landing: इंधनाच्या कमतरतेमुळे 'मेडे कॉल'नंतर इंडिगोच्या विमानाचे बेंगळुरूमध्ये आपत्कालीन लँडिंग
IndiGo flight (Photo Credit -Pexels)

IndiGo Flight Emergency Landing: अहमदाबाद विमान अपघातानंतर (Ahmedabad Plane Crash) विमान कंपन्या त्यांच्या प्रवाशांच्या सुरक्षेची अधिक काळजी घेत आहेत. गुवाहाटीहून चेन्नईला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाचे (IndiGo Flight) गुरुवारी रात्री विमानात इंधन कमी असल्याने एटीसीला 'मेडे कॉल' (Mayday Call) केल्यानंतर बेंगळुरू विमानतळावर आपत्कालीन लँडिंग (Emergency Landing) करण्यात आले. या विमानात 168 प्रवासी होते. प्राप्त माहितीनुसार, गुवाहाटीहून चेन्नईला जाणाऱ्या इंडिगोच्या विमान 6E 6764 ला गुरुवारी संध्याकाळी बेंगळुरूला आणीबाणीचा पर्याय म्हणून वळवावे लागले. इंधन पातळी अत्यंत कमी असल्याने पायलटने 'इंधन मेडे' असा दुर्मिळ कॉल दिला होता. गुवाहाटीहून सायंकाळी 4:40 वाजता निघालेले एअरबस A321 विमान मोठ्या प्रमाणात हवाई वाहतूक कोंडीमुळे चेन्नईत उतरू शकले नाही. त्यामुळे या विमानाचे बेंगळुरूमध्ये आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.

पाटलटने गुरुवारी रात्री 8:15 वाजता विमान बेंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षितपणे उतरले. वृत्तानुसार, विमान बेंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ (KIA) पासून सुमारे 35 नॉटिकल मैल अंतरावर होते तेव्हा पायलटने धोकादायकपणे कमी इंधन पातळीचे कारण देत एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) ला मेडे कॉल केला. मेडे कॉल हा विमान वाहतूक क्षेत्रातील सर्वोच्च पातळीचा आपत्कालीन इशारा आहे. हा कॉल फक्त जीवघेण्या परिस्थितीतच जारी केला जातो. (हेही वाचा - Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातानंतर DGCA दिले एअर इंडियाच्या 3 वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश)

दरम्यान, बेंगळुरू येथील एटीसीने तातडीने ग्राउंड टीमला सूचना दिली, ज्यांनी आपत्कालीन लँडिंगची तयारी केली. विमान रात्री 8:15 वाजता सुरक्षितपणे उतरले. सूत्रांनी पुष्टी केली की, सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स सुरक्षित आहेत. (हेही वाचा - Ahmedabad Plane Crash: एअर इंडिया अपघातातील 220 मृतांचे DNA जुळले; आतापर्यंत 202 मृतदेह कुटुंबियांना सुपूर्द)

चौकशी सुरू - 

मानक विमान वाहतूक प्रक्रियेनुसार, दोन्ही वैमानिकांना सविस्तर चौकशी होईपर्यंत ड्युटीवरून काढून टाकण्यात आले आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाला (DGCA) सूचित करण्यात आले असून ते इंधन नियोजन, एटीसी समन्वय आणि उड्डाणादरम्यान घेतलेल्या निर्णयांचा आढावा घेण्याची शक्यता आहे. अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान कोसळळ्याने काही दिवसांनंतर ही घटना समोर आली आहे. अहमदाबाद विमान अपघात हा भारताच्या इतिहासातील सर्वात वाईट विमान अपघातांपैकी एक आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jun 21, 2025 08:23 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).