
Bhiwadi Factory Fire: राजस्थानमधील खैरथल-तिजारा जिल्ह्यातील भिवाड़ी भागात एका कारखान्याला लागलेल्या आगीत चार जणांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी ही माहिती दिली. पोलिस उपअधीक्षक (तिजारा) शिवराज सिंह यांनी सांगितले की, मंगळवारी संध्याकाळी उशिरा कारखान्यात आग लागली, ज्यामध्ये एकाचा मृत्यू झाला आणि 10 जण जखमी झाले. आग आटोक्यात आणण्यात आल्याचे त्यांनी सांगितले, मात्र धुरामुळे अग्निशमन दलाला आत जाता आले नाही, रात्री उशिरा कारखान्यातून आणखी तीन मृतदेह बाहेर काढण्यात आले.