ठळक बातम्या
Mumbai Weather Update: मुंबईत थंडीची हुडहुडी वाढली; 29 नोव्हेंबरला 8 वर्षातील सर्वात थंड दिवस, पहा हवामान विभागाचा अंदाज
Dipali Nevarekarआयएमडीच्या माहितीनुसार, मुंबई मध्ये 5 डिसेंबर पर्यंत हवामान 19 ते 35 डिग्री सेल्सियस मध्ये राहणार आहे. मुंबईमध्ये सकाळी आकाशात धुकं राहील.
Maharashtra Lottery Result: महाराष्ट्रलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी शनि, गणेशलक्ष्मी समृद्धी, महा. सह्याद्री प्रभालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Jyoti Kadamमहाराष्ट्रलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी शनि, गणेशलक्ष्मी समृद्धी, महा. सह्याद्री प्रभालक्ष्मी लॉटरींची आज सोडत आहे. जाणून घ्या तुम्ही आजचे विजेते आहात का? लॉटरींची सोडत रोज दुपारी 4 वाजता होते.
Cyclone Fengal: तामिळनाडूमध्ये चक्रीवादळ फेंगल आज दाखवणार कहर; वाऱ्याचा वेग ताशी 90 किमी असण्याची शक्यता
Bhakti Aghavचक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद राहणार आहेत. याबाबत अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. भारतीय हवामान विभागाने शुक्रवारी सांगितले की, चक्रीवादळ शनिवारी दुपारपर्यंत पुद्दुचेरीजवळ पोहोचण्याची शक्यता आहे. या वेळी वाऱ्याचा वेग ताशी 90 किमी असू शकतो.
Boat Capsize in Nigeria: नायजेरियात मोठी दुर्घटना! 200 हून अधिक प्रवाशांना घेऊन जाणारी बोट नदीत उलटली; 27 जणांचा मृत्यू, 100 जण बेपत्ता
Jyoti Kadamआफ्रिकेतील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या नायजेरियामध्ये अशा प्रकारच्या जीवघेण्या घटना चिंतेचा विषय बनत आहेत. गेल्या काही दिवसांपासून बोट उलटल्याच्या घणांमध्ये वाढ झालीय. ताज्या घटनेत 27 जणांचा मृत्यू झाला. 100 जण बेपत्ता आहेत.
Navi Mumbai Dilapidated Buildings: नवी मुंबईमधील 527 संरचना जीर्ण म्हणून घोषित; 30 वर्षांहून अधिक जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करणे बंधनकारक
Prashant Joshiयाबाबत 31 मार्च 2025 पूर्वी संबंधित प्रभाग कार्यालय किंवा नगररचना विभागाकडे लेखापरीक्षण आणि अहवाल सादर करायचा आहे. नागरी संस्थेने घालून दिलेल्या निकषांचे पालन न करणाऱ्यांना दंड भरावा लागेल.
India vs Prime Minister XI Live Streaming: ऑस्ट्रेलिया पीएम इलेव्हन आणि भारतीय संघ यांच्यात होणार चुरशीची लढत, तुम्ही येथे पाहू शकता विनामूल्य मॅच
Nitin Kurhe30 नोव्हेंबरपासून ॲडलेडमध्ये कांगारूंशी सामना करण्यापूर्वी हा संघ पंतप्रधान इलेव्हन विरुद्ध दोन दिवसीय गुलाबी चेंडूची कसोटी खेळेल. टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्माही या सामन्यात खेळणार आहे. या सामन्यात दोन्ही संघातील अनेक स्टार खेळाडू खेळण्याची अपेक्षा आहे.
SA vs SL 1st Test 2024 Day 3 Scorecard: तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, श्रीलंकेने दुसऱ्या डावात 5 गडी गमावून केल्या 103 धावा, दक्षिण आफ्रिका विजयापासून 5 विकेट दूर
Nitin Kurheतिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत श्रीलंकेने दुसऱ्या डावात 103 धावांत 5 गडी गमावले होते आणि आता त्यांना विजयासाठी 413 धावांची गरज आहे. तर दक्षिण आफ्रिकेला पाच विकेट्सची गरज आहे. चौथ्या दिवशीचा खेळ निर्णायक असेल. शेवटचे दोन दिवस श्रीलंकेसाठी खूप आव्हानात्मक ठरतील.
Mohammed Shami Injury: टीम इंडियासाठी चिंतेची बाब, मोहम्मद शमी पुन्हा झाला जखमी
Nitin Kurheशमीच्या दुखापतीची बातमी काही दिवसांपूर्वीच या स्पर्धेदरम्यान समोर आली होती. अशा परिस्थितीत शमीला दुखापत होणे ही खरोखरच टीम इंडियासाठी चिंतेची बाब आहे. यावेळी शमीला पाठीचा त्रास आहे.
Thane: भिवंडीत इमारतीच्या टेरेसवर हस्तमैथुन करणाऱ्या 20 वर्षीय तरुणाला अटक; गुन्हा दाखल
Prashant Joshiइमारतीत लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आरोपीचे हे कृत्य कैद झाले आहे. आरोपीचे हे कृत्य पाहून तिथे उपस्थित असलेल्या महिलांना विनयभंग झाल्याचे वाटले. त्यानंतर पोलीस ठाणे गाठून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
Ishan Kishan Syed Mushtaq Ali: 09 षटकार, 05 चौकार... इशान किशनने केला कहर, संघ 4.3 षटकात विजयी
Nitin Kurheशुक्रवारी अरुणाचल प्रदेशविरुद्धच्या सामन्यात इशान किशनने 23 चेंडूत 77 धावांची तुफानी खेळी केली. त्याने आपल्या खेळीत नऊ षटकार आणि पाच चौकार मारले, या खेळीमुळे झारखंड संघाने 4.3 षटकात लक्ष्य गाठले. इशान किशनने अवघ्या 16 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.
Waqf Board: वक्फ बोर्डाला 10 कोटी निधी देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने मागे घेतला; BJP ने केला होता विरोध
Prashant Joshiकाही त्रुटींमुळे असा आदेश काढण्यात आल्याचे बोलले जात आहे. अल्पसंख्याक विकास विभागाने 28 नोव्हेंबर रोजी आपला आदेश जारी केला होता. जूनमध्ये निवडणुकीपूर्वी अल्पसंख्याक कल्याण विभागाने औरंगाबाद येथील वक्फ बोर्डाला दोन कोटी रुपये दिले असून उर्वरित रक्कम नंतर देण्यात येईल, असे जाहीर केले होते.
11 Bowlers Used in a T20 Match: दिल्ली संघाने टी-20 मध्ये इतिहास रचला, पहिल्यांदाच एका सामन्यात सर्व 11 खेळाडूंनी केली गोलंदाजी
Nitin Kurheशुक्रवारी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024-25 च्या गट सी सामन्यात मणिपूर विरुद्ध खेळताना, आयुष बडोनीच्या नेतृत्वाखालील दिल्ली संघाने नियुक्त केलेल्या यष्टीरक्षकासह सर्व 11 खेळाडूंना किमान एक षटक दिले. यष्टिरक्षक आणि कर्णधार आयुष बडोनीने दोन षटके टाकली आणि एक विकेटही घेतली.
Gondia Shivshahi Bus Accident: गोंदिया बस अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना केंद्र व राज्य सरकारकडून मदत जाहीर; PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
Prashant Joshiपंतप्रधान यांनी ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधी’तून मृतांच्या कुटुंबियांसाठी 2 लाख रुपयांची मदत तर जखमी झालेल्या प्रवाशांसाठी 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.
Employment Through Gig Economy: भारताची गिग अर्थव्यवस्था निर्माण करू शकेल 9 कोटींहून अधिक रोजगाराच्या संधी; GDP मध्ये 1.25 टक्क्यांची भर- Report
Prashant Joshi'फोरम फॉर प्रोग्रेसिव्ह गिग वर्कर्स' च्या अहवालात म्हटले आहे की, ई-कॉमर्स, वाहतूक, वितरण सेवा आणि इतरांना समर्थन देणारी गिग अर्थव्यवस्था येत्या काही वर्षांत 17 टक्क्यांच्या विकास दराने (CAGR) वाढून $455 अब्जपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.
WI vs BAN 2nd Test 2024 Live Streaming: बांगलादेशला पराभूत करून मालिका काबीज करण्याच्या इराद्याने वेस्ट इंडिज उतरणार मैदानात, येथे जाणून घ्या थेट सामन्याचा कधी, कुठे घेणार कसा आनंद
Nitin Kurheपहिल्या कसोटीत वेस्ट इंडिजने बांगलादेशचा 201 धावांनी पराभव केला. यासह यजमान वेस्ट इंडिजने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता मालिकेतील दुसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात बांगलादेशला हरवून मालिका काबीज करण्याच्या इराद्याने वेस्ट इंडिजचा संघ उतरणार आहे.
Team India New ODI Jersey: बीसीसीआयने केले टीम इंडियाच्या नवीन वनडे जर्सीचे अनावरण, जाणून घ्या त्याची सर्वात मोठी वैशिष्ट्ये
Nitin Kurheभारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह आणि महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर यांच्या उपस्थितीत नवीन जर्सीचे लाँच करण्यात आले. टीम इंडियाच्या नवीन वनडे जर्सीमध्ये अनेक गोष्टी पाहायला मिळतील.
Resolution Against Use Of Vulgar Language: राज्यातील 'या' गावात महिलांच्या सन्मानार्थ असभ्य भाषेच्या वापराविरोधात ठराव मंजूर; षिविगाल केल्यास आकाराला जाणार 500 रुपये दंड
Prashant Joshiआपल्या मुद्द्यावर जोर देताना अरगडे म्हणाले की, अशी भाषा वापरणारे हे विसरतात की आपण माता-भगिनींच्या नावाने जे बोलतो ते आपल्या कुटुंबातील महिला सदस्यांनाही लागू होते. आम्ही अपमानास्पद भाषेवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला असून अपशब्द वापरणाऱ्यांना 500 रुपये दंड आकारला जाईल.
New Zealand vs England 1st Test 2024 Day 3 Live Streaming: न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या दिवसाचा खेळाला कधी होणार सुरुवात? कुठे पाहणार लाइव्ह? जाणून घ्या एका क्लिकवर
Nitin Kurheदुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने 74 षटकांत 5 गडी गमावून 319 धावा केल्या होत्या. पाहुणा संघ सध्या न्यूझीलंडपेक्षा 29 धावांनी मागे आहे. सध्या इंग्लंडसाठी हॅरी ब्रूक 163 चेंडूत नाबाद 132 धावा आणि बेन स्टोक्स 76 चेंडूत 37 धावा करून नाबाद आहे.
Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनाबाबत आयसीसीची बैठक संपली, मोठे अपडेट आले समोर
Nitin KurheICC Champions Trophy 2025: आयसीसीने या मेगा स्पर्धेच्या यजमानपदाची जबाबदारी पाकिस्तानला दिली होती. पण भारताने पाकिस्तानात जाण्यास नकार देत स्पर्धा हायब्रीड मॉडेलवर खेळवावी अस सांगितले. पण पाकिस्तानला हायब्रीड मॉडेलला पुर्णपणे नकार दिला आहे.
IND vs AUS 2nd Test 2024: ॲडलेड कसोटीपूर्वी टीम इंडियाला मिळाली आनंदाची बातमी, स्टार खेळाडू मैदानात परतण्यासाठी सज्ज!
Nitin KurheIND vs AUS: विशेष म्हणजे शुभमनला पाहिल्यानंतर तो अंगठ्याच्या दुखापतीतून पूर्णपणे बरा झाल्याचं दिसत होतं. दुखापतीमुळे गिल पर्थ कसोटीत संघात नव्हता. जर हा उजव्या हाताचा फलंदाज पूर्णपणे तंदुरुस्त होऊन ॲडलेडमध्ये मैदानात उतरला तर टीम इंडियासाठी ती मोठी बूस्टर असेल.