Cyclone Fengal: तामिळनाडूमध्ये चक्रीवादळ फेंगल आज दाखवणार कहर; वाऱ्याचा वेग ताशी 90 किमी असण्याची शक्यता

याबाबत अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. भारतीय हवामान विभागाने शुक्रवारी सांगितले की, चक्रीवादळ शनिवारी दुपारपर्यंत पुद्दुचेरीजवळ पोहोचण्याची शक्यता आहे. या वेळी वाऱ्याचा वेग ताशी 90 किमी असू शकतो.

Cyclone Fengal प्रतिकात्मक प्रतिमा) फोटो सोजन्य - X/@sreeram)

Cyclone Fengal Update: चक्रीवादळ फेंगल (Cyclone Fengal) शनिवारी दुपारी पुद्दुचेरीजवळ पोहोचण्याची शक्यता आहे. याबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी स्थानिक लोकांना घरातच राहण्याचा सल्ला दिला आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद राहणार आहेत. याबाबत अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. भारतीय हवामान विभागाने शुक्रवारी सांगितले की, चक्रीवादळ शनिवारी दुपारपर्यंत पुद्दुचेरीजवळ पोहोचण्याची शक्यता आहे. या वेळी वाऱ्याचा वेग ताशी 90 किमी असू शकतो.

जिल्हा दंडाधिकारी ए कुलोथुंगन यांनी पीडब्ल्यूडी, स्थानिक प्रशासन, पोलीस आणि इतर विभागांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला आहे. दरम्यान, पुडुचेरी आणि चेन्नईच्या समुद्रात उंच लाटा उसळू लागल्या आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेने जारी केलेल्या व्हिडीओमध्ये फेंगल चक्रीवादळामुळे समुद्रात उंच लाटा उसळताना आणि मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. (हेही वाचा -Cyclone Fengal Updates: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा; पुदुच्चेरी किनारपट्टीजवळ चक्रीवादळ फेंगल कमकुवत होण्याची शक्यता)

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, फेंगल चक्रीवादळ आज संध्याकाळपर्यंत पुद्दुचेरी आणि चेन्नईच्या किनारपट्टीवर धडकेल. दरम्यान, तामिळनाडूमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी नुकतीच खबरदारीच्या उपायांचा आढावा घेण्यासाठी सचिवालयात उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. परिस्थितीचा सामना करण्यासाठी NDRF आणि राज्य संघांना तिरुवरूर, मायिलादुथुराई, नागापट्टिनम, कुड्डालोर जिल्ह्यात रवाना करण्यात आले आहे. (हेही वाचा, Cyclone Fengal Nears Tamil Nadu: तामिळनाडूच्या समुद्रात 'फेंगल' चक्रीवादळ; आयएमडीनेकडून सावधानतेचा इशारा, समुद्र किनारपट्टी भागातील शाळा बंद)

तथापी, पावसामुळे चेन्नईच्या ओएमआर रोडसह अनेक भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक प्रभावित झाली आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर विमानांच्या उड्डाणांमध्येही बदल करण्यात आले आहेत. या कारणास्तव, घर सोडण्यापूर्वी, दिशानिर्देश आणि उड्डाणांची माहिती घेणे सुनिश्चित करणे आवश्यक आहे.