Esha Deol Viral Video: सुजलेल्या ओठांमुळे ईशा देओल सोशल मीडियावर झाली ट्रोल, पाहा व्हायरल Video
Esha Deol Video Viral, PC TWITTER

Esha Deol Viral Video: अभिनेत्री हेमा मालिनी आणि अभिनेता धर्मेंद्र यांची लाडकी लेक ईशा देओल नेहमी काहीना काही गोष्टींवरून चर्चेत राहते. फेब्रुवारी महिन्यात बॉलिवूडची अभिनेत्री ईशा देओलने पती भरत तख्तानीपासून घटस्फोट घेतला होता. त्यानंतर  ती मुलांना घेऊन आईच्या घरी राहते. लोकसभा निवडणूकीच्या प्रसार, प्रसारासाठी हेमा मालिनी व्यस्त आहेत. आईच्या विजयासाठी ईशा आणि तिची दुसरी बहिण अहाना बांके बिहारी मंदिराला भेट दिली. माध्यमांशी बोलतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. (हेही वाचा- दोन सख्या भावंडांची हत्या, आईवर जीवघेणा हल्ला; वडिलांचा मृतदेह रेल्वे रुळांवर सापडला; )

मिळालेल्या माहितीनुसार, हेमा मालिनी निवडणूक लढणार असल्याने दोघी बहिणींनी बांके बिहारी मंदिराला भेट दिली. यावेळी दोघीं जणी माध्यामांशी बोलताना दिसल्या. माध्यमांशी बोलताना हेमा मालिनी यांच्या विकास कामे सांगितली. यावेळी ईशा यांना पाहून चाहत्यांना धक्का लागला आहे. त्यांच्या ओठांची सर्जरी केल्याचे दिसत आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, ईशाचे ओठ सुजले आहेत. ओठांना पाहून आश्चर्य वाटले आहे.

या व्हिडिओला अनेक नेटकऱ्यांनी कंमेट केले आहे. एकाने लिहले आहे की, ओठांवरची सर्जरी ही चुकली झाली आहे का?. तर दुसऱ्यांने लिहले आहे की, हिचे ओठ मधमाशीने दंश केल्यासारखे दिसत आहेत. तिसऱ्या युजर्संनी लिहले आहे, 'मला समजत नाही की अभिनेत्री लिप जॉब का करायला जातात? शेवटी याची काय गरज आहे?’ तर काहींना हसू आवरत नाही.