Close
Advertisement
 
सोमवार, डिसेंबर 16, 2024
ताज्या बातम्या
20 seconds ago

Must Watch: रामदास आठवले कविता फूल व्हिडिओ; नरेंद्र मोदी, राहुल गांधी, सोनिया गांधी यांनीही दिली दाद

व्हायरल अण्णासाहेब चवरे | Jun 19, 2019 04:35 PM IST
A+
A-

Monsoon Session of Parliament 2019:  केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांचे भाषण म्हटलं की, ते कवितेशिवाय पूर्ण होणं तसं अशक्यच. संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान आज ( बुधवार, 19 जून 2019) लोकसभा (Lok Sabha) सभागृहात पुन्हा एकदा त्याची प्रचिती आली. निमित्त होतं नवनिर्वाचीत लोकसभा सभापती ओम बिरला यांच्या अभिनंदनाचं. केंद्रीय मंत्री या नात्याने सभागृहाचा सदस्य नसतानाही लोकसभेत उपस्थित राहात रामदास आठवले यांनी सभापती ओम बिरला यांचे अभिनंदन केले. या दरम्यान भाषण ठोकताना आठवले यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या सुभेच्छा दिल्याच. पण, आपल्या खास अंदाजात कविता सादर करत विरोधकांना चिमटेही काढले. भाषणादरम्यान आठवले यांचे फुललेले कवित्व पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि युपीए अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनाही यांनीही मनमुराद हसत दाद दिली.

खासदार ओम बिरला हे 17 व्या लोकसभेचे सभापती म्हणून निवडले गेले. दरम्यान, ओम बिरला यांच्या निवडीनंतर लोकसभेतील सदस्य त्यांचे अभिनंदन करत होते. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सभागृहातील इतरही काही मंत्री आणि खासदारांनी अभिनंदनपर भाषणं केली. पण, सर्वाधिक आकर्षणाचा, चर्चेचा आणि सभागृहात हस्याची लकेर उमटवणारे भाषण ठरले ते सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे.

रामदास आठवले यांचे लोकसभेतील विनोदी भाषण आणि कविता

रामदास आठवले यांनी आपल्या भाषणात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा देताना ते म्हणाले, 'राहुल गांधी यांनी जोरदार प्रयत्न केले. पण, लोकशाहीमध्ये जनमताच्या आदेशानुसार सरकार बनते. जेव्हा आपण सत्तेत होता तेव्हा मी आपल्यासोबत होतो. पण, आता आपली सत्ता नाही. लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसवाल्या लोकांनी मला म्हटले आमच्याकडे या. पण, मी हवेचा प्रवाह पाहिला आणि मोदींसोबत आलो ' (हेही वाचा, रामदास आठवले यांची विनोदी कविता ऐकून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राहुल गांधी, सोनिया गांधी खळखळून हसले)

पुढे बोलताना आठवले म्हणाले, विधेयकं पास करण्यासाठी विरोधी पक्षांची गरज असते. आता आम्ही सत्तेत आहोत. आमचे सरकार 5 वर्षे सत्तेत राहिली. त्यानंतरही पाच वर्षे सत्तेत राहिल आणि त्यापूढेही आम्ही सत्तेत राहू. जर आम्ही वाईट काम केले तरच आपले सरकार येईल. पण आम्ही तसे होऊच देणार नाही, असेही रामदास आठवले म्हणाले.

रामदास आठवले यांची कविता त्यांच्याच शब्दात..

हर बार की तरह रामदास अठावले ने इस बार भी सदन में कविता सुनाई.

'एक देश का नाम है रोम, लोकसभा के अध्यक्ष बन गए बिड़ला ओम

लोकसभा का आपको अच्छी तरह चलाना है काम, वेल में आने वालों का ब्लैक लिस्ट में डालना है नाम

नरेंद्र मोदी और आपका दिल है विशाल, राहुल जी आप रहो खुशहाल

हम सब मिलकर एकता की मशाल, भारत को बनाते हैं और भी विशाल

आपका राज्य है राजस्थान, लेकिन लोकसभा की आप बन गए शान

भारत की हमें बढ़ानी है शान, लोकसभा चलाने के लिए आप हैं परफेक्ट हैं मैन'

दरम्यान, रामदास आठवले यांनी सभापती ओम बिरला यांनाही विनोदाने म्हटले की, आपण हसत नाही. पण मी आपल्याला हसवत राहीन. रामदास आठवले लोकसभेचे सदस्य नाहीत. पण, केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचा प्रमुख या नात्याने त्यांनी संसदेत भाषण केल.

RELATED VIDEOS