Syska Bolt SW200 स्मार्टवॉच भारतात लॉन्च, SpO2 सेंसरसह जाणून घ्या किंमत
Syska Bolt SW200 (Photo Credits-Twitter)

Syska कंपनीचे शानदार Syska Bolt SW200 स्मार्टवॉच भारतात लॉन्च झाले आहे. हे स्मार्टवॉट हार्ट रेट आणि ब्लड मध्ये ऑक्सिजन लेव्हल मॉनिटर करण्यास सक्षम आहे. यामध्ये 100 वॉच फेससह तामपान अपडेटची सुविधा सुद्धा दिली आहे. या व्यतिरिक्त सिसका बोल्ड एसडब्लू200 स्मार्टवॉचमध्ये सॅनिटायझेशन रिमाइंडर, कॅमेरा कंट्रोल आणि कॉल-मेसेज नोटिफिकेशन सारखे फिचर्स मिळणार आहेत.(Online Harassment रोखण्यासाठी Google Update करणार Search Algorithms)

कंपनीच्या या स्मार्टवॉचमध्ये 1.28 इंचाचा आयपीएस डिस्प्ले दिला आहे. याचा रेजॉल्यूशन 240X240 पिक्सल आहे. या वॉचला IP68 चे सर्टिफिकेशन मिळाले आहे. म्हणजेच हे 1.5 मीटर पर्यंतच्या पाण्यात सुद्धा काम करु शकणार आहे. या व्यतरिक्त स्मार्टवॉचमध्ये हार्ट रेट मॉनिटर, मेंस्ट्रुअल सायकल ट्रॅकर आणि SpO2 सेंसर दिला आहे. तसेच 10 वॉच फेस दिले गेले आहेत. त्यामुळे युजर्सला आपल्या पसंदीनुसार ते सेट करता येणार आहे. ऐवढेच नव्हे तर युजर्सला वॉट मध्ये आपले फोटो सुद्धा वॉचच्या फेसवर ठेवता येऊ शकतात. तर रनिंग आणि सायकलिंग सारखे स्पोर्ट्स मोड मिळणार आहेत.

या स्मार्टवॉचच्या अन्य फिचर्स बद्दल बोलायचे झाल्यास, Syska Bolt SW200 मध्ये वातावरणाच्या अपडेटची सुविधा मिळणार आहे. युजर्स वॉचच्या मदतीने वॉटर इंटेक ट्रॅक करु शकतात. तसेच वॉचमध्ये कॉल-मेसेज नोटिफिकेशन. कॅमेरा कंट्रोल आणि म्युझिक प्ले/पॉझ सारखे फिचर्स दिले आहेत. याची खरी किंमत 5,499 रुपये आहे. मात्र फ्लिपकार्टवर हे फक्त 2,499 रुपयांना खरेदी करता येणार आहे. हे वॉच ब्लॅक, ब्लू आणि ग्रीन रंगात उपलब्ध आहे.(Noise Air Buds Mini भारतात लाँच, 15 तासांचा बॅकअप देणा-या या ईयरबड्सची काय आहे किंमत?)

Syska bolt SW200 स्मार्टवॉचला भारतीय बाजारात Honor Band 6 टक्कर देणार आहे. ऑनर बँड 6 ची किंमत 3,999 रुपये आहे. Honar Band 6.1.47 इंचाचा एमोलेड डिस्प्ले, हार्ट-रेट आणि SpO2 सेंसर लैस आहे. यामध्ये 180mAh ची बॅटरी दिली आहे. ही बॅटरी सिंगल चार्जमध्ये 14 दिवसांचा बॅकअप देणार आहे. तसेच फिटनेस बँन्डला 5ATM रेटिंग मिळाली आहे.