Galaxy A03 स्मार्टफोन भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमतीसह अधिक
Galaxy A03 (Photo Credits-Twitter)

सॅमसंगने आपला स्वस्त Galaxy A03 स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. फोनला 5000mAh ची मोठी बॅटरी आणि 48 मेगापिक्सेल ड्युअल कॅमेरा सेटअप सह सादर करण्यात आला आहे. भारतात,Galaxy A03 ची Realme Narzo 30A आणि Infinix Hot 10S सोबत स्मार्टफोनची टक्कर असणार आहे. Samsung Galaxy A03 स्मार्टफोन ब्लॅक, ब्लू आणि रेड या तीन कलर पर्यायांमध्ये सादर करण्यात आला आहे.(Oppo Find X5, Find X5 Pro स्मार्टफोन लाँच; जाणून घ्या किंमत आणि खास स्पेसिफिकेशन्स)

Galaxy A03 स्मार्टफोनच्या 3 GB रॅम आणि 32 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 10,499 रुपये आहे. तर 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 11,999 रुपयांना मिळेल. Samsung Galaxy A03 स्मार्टफोन Samsung.com आणि आघाडीच्या ऑनलाइन स्टोअरमधून खरेदी केला जाऊ शकतो. मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने फोनचा रॅम 1 टीबीपर्यंत वाढवता येते. तर Galaxy A03 हा ए-सीरीजचा 2022 मध्ये लॉन्च होणारा पहिला स्मार्टफोन आहे.(Chinese Apps Ban in India: चीनवर भारताचा डिजिटल स्ट्राइक; मोदी सरकारने Free Fire सह 54 चिनी अॅप्सवर घातली बंदी, येथे पहा यादी)

Samsung Galaxy A03 स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा HD+ TFT LCD Infinity-V डिस्प्ले आहे. Galaxy A03 स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. त्याचा मुख्य कॅमेरा खरा 48MP मागील कॅमेरा सपोर्टसह येईल. याशिवाय 2MP डेप्थ कॅमेरा लाईव्ह फोकस देण्यात आला आहे. Samsung Galaxy A03 स्मार्टफोनमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 5MP फ्रंट कॅमेरा सपोर्ट आहे, जो ब्युटी मोड सपोर्टसह येतो. प्रोसेसरबद्दल बोलायचे झाले तर, Galaxy A03 स्मार्टफोन  दमदार ऑक्टा-कोर 1.6GHz Unisoc T606 प्रोसेसर सपोर्टसह येतो. पॉवर बॅकअपसाठी फोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. Galaxy A03 Android 11 आधारित One UI Core 3.1 वर काम करणार आहे.