Realme चा 64MP कॅमेरा असलेल्या स्मार्टफोनवर 9 हजारांची सूट, जाणून घ्या ऑफर बद्दल अधिक
Realme (Photo Credits: Realme India)

Realme चा फ्लॅगशिप स्मार्टफोन Realme GT Neo 2 च्या खरेदीवर 9000 रुपयांचा दमदार डिस्काउंट दिला जाणार आहे. फोन ऑक्टोंबर 2021 मध्ये 31,999 रुपयांच्या सुरुवाती किंमतीत लॉन्च करण्यात आला होता. जो 9000 रुपयांच्या डिस्काउंटवर 22,999 रुपयांत विक्रीसाठी फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. दरम्यान, मर्यादित कालावधीसाठी म्हणजेच 28 फेब्रुवारी पर्यंत लाइव्ह राहणार आहे. फोनला 5000mAh बॅटरी, 120Hz रिफ्रेस्ड रेट आणि 64MP ट्रिपल कॅमेरा सेटअपसह येणार आहे. फोनची टक्कर भारतात iQOO7, Mi 11x आणि OnePlus 9R सोबत आहे.

Realme GT Neo 2 स्मार्टफोनच्या 8 जीबी आणि 128 जीबी वेरियंटच्या किंमतीत 31,999 रुपये आहे. तर 12 बीजी रॅम आणि 256 जीबी वेरियंटची किंमतीत 35,999 रुपये आहे. परंतु डिस्काउंट नंतर फोन 22,999 रुपये आणि 25,999 रुपयांत खरेदी करता येणार आहे. हे दोन्ही स्मार्टफोन HDFC कार्डच्या माध्यमातून खरेदी केल्यास 3000 रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे. तसेच UPI पेमेंटवर 6000 रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे. या व्यतिरिक्त फ्लिपकार्टकडून 3000 रुपयांच्या एक्स्ट्रा डिस्काउंट दिला जाणार आहे. या फोनवर अधिकाधिक 9000 रुपयांची सूट मिळणार आहे. (Google Map च्या माध्यमातून तुम्हाला घरबसल्या कोणालाही करता येईल ट्रॅक, जाणून घ्या अधिक)

रिअलमी जीटी नियो 2 मध्ये 6.62 इंचाचा Samsung E4 डिस्प्ले दिला गेला आहे. जो 120 हटर्ज रिफ्रेश रेट, 600 हटर्ज टच सॅम्पलिंग रेट, 1300nit पीक ब्राइटनेस आणि HDR10+ सपोर्ट व Dc Dimming सह येणार आहे. फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 870 प्रोसेसर पेक्षा लैस आहे. फोन अॅन्ड्रॉइ़ 11 आधारित Realme UI 2.0 वर काम करणार आहे. यामध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला गेला आहे. याचा प्रायमरी कॅमेरा 64MP मेगापिक्सलचा असणार आहे. तसेच 8 मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 2 मेगापिक्सल मॅक्रो लेन्स दिली गेली आहे. फोन 5,000mAh बॅटरी सपोर्टसह येणार आहे. जो 65W सुपर डॉर्ट चार्जिंग सपोर्ट दिला गेला आहे. कंपनीच्या दाव्यानुसर फोन 0 ते 100 टक्के चार्जिंग 36 मिनिटांत होणार आहे.