Lumiford ने भारतात लाँच केले MAX T55 वायरलेस इयरफोन; जाणून घ्या किंमत
Lumiford MAX T55 (PC - Twitter)

Lumiford MAX T55 Wireless Earphones: ऑडिओ कंपनी लुमीफोर्डने आपले जबरदस्त MAX T55 वायरलेस इयरफोन भारतात लॉन्च केले आहेत. या इयरफोनची डिझाईन आकर्षक असून ती केवळ ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. MAX T55 मध्ये हाय-फाय बास आणि 6 मिमी डायनॅमिक ड्राइव्हर्स आहेत. याशिवाय इयरफोनमध्ये युजर्सला मजबूत बॅटरी मिळेल.

लुमीफोर्ड MAX T55 किंमत -

लुमीफोर्ड MAX T55 इयरफोनची किंमत 3,599 रुपये आहे. हा ईअरफोन कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि ऑफलाइन रिटेल स्टोअरमधून खरेदी करता येईल. (वाचा - Union Budget 2021: डिजिटल व्यवहारांवर मिळणार मोठी सवलत; केंद्रीय अर्थसंकल्पात सरकारची महत्त्वाची घोषणा)

Lumiford MAX T55 स्पेसिफिकेशन्स -

MAX T55 वायरलेस इयरफोनमध्ये कंपनीने उत्कृष्ट ध्वनीसाठी हाय-फाय बास प्रदान केला आहे. याव्यतिरिक्त यात ब्लूटूथ व्हर्जन 5.0 सपोर्ट आहे. त्याची कनेक्टिव्हिटी रेंज 10 मीटर आहे. याशिवाय MAX T55 इयरफोनमध्ये 6 मिमी डायनॅमिक ड्राइव्हर्स देण्यात आले आहेत.

मजबूत बॅटरीने सुसज्ज -

वापरकर्त्यांना MAX T55 इयरफोनमध्ये 30 एमएएच बॅटरी मिळेल, जी 3 तासांचा बॅकअप देते. यात 400mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. त्याचबरोबर कंपनीचा असा दावा आहे की, MAX T55 ची बॅटरी एका चार्जवर 15 तासांचा बॅकअप देईल.

टच स्मार्ट कंट्रोल -

MAX T55 इयरफोनमध्ये टच कंट्रोल वैशिष्ट्य आहे. याद्वारे, वापरकर्ते संगीत बदलण्यासह कॉल उचलणे आणि कट करण्यापर्यंत सर्व फिचर्स देण्यात आले आहेत.

BlackStone BT11 -

कंपनीने मागील वर्षी BlackStone BT11 स्पीकर लॉन्च केले होते. या डिव्हाइसची किंमत 1,999 रुपये आहे. BlackStone BT11 ब्लूटूथ स्पीकर आयपीएक्स 7 प्रमाणित आहे. म्हणजेच हे डिव्हाइस वॉटरप्रूफ आहे. या स्पीकरचा आकार खूपच संक्षिप्त आहे आणि म्हणून वापरकर्ते ते कोठेही सहजपणे घेऊ शकतात. यात हँड्स फ्री कॉलिंग माइक आहे. यात 40 मिमी बेस ड्राइव्हर्स आणि बॅटरी क्षमता आहे. याव्यतिरिक्त, डिव्हाइसमध्ये 3.5 मिमी एयूएक्स कनेक्शन आहे. कनेक्टिव्हिटीसाठी ब्लॅकस्टोन बीटी 11 ब्लूटूथ स्पीकरमध्ये ब्लूटूथ 5.0 सपोर्ट देण्यात आला आहे. ज्यात ट्रांसमिशन रेंज 10m आहे. या डिव्हाइसची फ्रीक्वेंसी रिस्पॉन्स 80Hz ~ 20KHz आहे.