Jio Short Video App: Instagram Reels ला टक्कर देण्यासाठी जिओ लाँच करणार शॉर्ट व्हिडिओ अॅप; मिळणार 'हे' खास फिचर्स

लोकांना इंस्टाग्राम रील आणि यूट्यूब शॉर्ट्स सर्वात जास्त आवडतात. आता जिओ आपले शॉर्ट व्हिडिओ अॅप बाजारात आणणार आहे.

Close
Search

टेक्नॉलॉजी Bhakti Aghav|
Jio Short Video App: Instagram Reels ला टक्कर देण्यासाठी जिओ लाँच करणार शॉर्ट व्हिडिओ अॅप; मिळणार 'हे' खास फिचर्स
Jio, Instagram (PC - Facebook)

Jio Short Video App: भारतात टिकटॉकवर बंदी घातल्यापासून अनेक नवीन शॉर्ट व्हिडिओ अॅप्स बाजारात आले आहेत. या सर्व अॅप्सपैकी, लोकांना इंस्टाग्राम रील आणि यूट्यूब शॉर्ट्स सर्वात जास्त आवडतात. आता जिओ आपले शॉर्ट व्हिडिओ अॅप बाजारात आणणार आहे. बातमीवर विश्वास ठेवला तर जिओ लवकरच प्लॅटफॉर्मवर शॉर्ट व्हिडिओ अॅप सादर करणार आहे. या अॅपसाठी कंपनीने रोलिंग स्टोन इंडिया आणि क्रिएटिव्हलँड एशियासोबतही भागीदारी केली आहे.

या अॅपद्वारे जगभरातील प्रतिभावान लोकांना प्रोत्साहन देण्याचा कंपनीचा उद्देश आहे. यासोबतच प्लॅटफॉम अॅप पेड अल्गोरिदमऐवजी ऑर्गेनिक ग्रोथवर काम करेल. प्लॅटफॉर्मसह वापरकर्त्यांना त्यांच्या लोकप्रियतेनुसार सिल्व्हर, ब्लू आणि रेड टिक्स देखील मिळतील. याशिवाय, निर्मात्याच्या प्रोफाइलमध्ये एक बुक नाऊ बटण देखील प्रदान केले जाईल, ज्याद्वारे कोणीही त्या निर्मात्याला बुक करू शकेल. यामध्ये तुम्हाला कमाईची सुविधाही मिळेल. (हेही वाचा - Jio True 5G in Pune: पुण्यात सुरू झाली रिलायन्स जिओची 5जी सेवा; मिळणार 1Gbps पर्यंत इंटरनेट स्पीड)

Jio Platfom अॅप पुढील वर्षी लाँच केले जाईल आणि या नवीन अॅपमध्ये कंपनी संस्थापक सदस्य कार्यक्रम देखील सादर करत आहे, ज्यानुसार 100 संस्थापक सदस्यांना केवळ आमंत्रित वैशिष्ट्यावर प्रवेश मिळेल. त्यांच्या प्रोफाइलमध्ये गोल्डन टिक देखील असेल. हे संस्थापक सदस्य इतर कोणत्याही कलाकार आणि निर्मात्याला आमंत्रित करू शकतील. (हेही वाचा - 5G Service in India: Jio ला टक्कर देण्यासाठी Airtel सज्ज; ऑगस्ट महिना अखेरीस सुरू होणार सेवा)

दरम्यान, हे अॅप गायक, संगीतकार, नर्तक, फॅशन डिझायनर यासारख्या प्रभावशाली व्यक्तींना लक्ष्य करेल. या अॅपच्या लॉन्चच्या वेळी, जिओ प्लॅटफॉर्मचे सीईओ किरण थॉमस म्हणाले, 'जिओ प्लॅटफॉर्मवर, आमचे ध्येय आमच्या ग्राहकांसाठी नाविन्यपूर्ण उपाय आणि अनुभव तयार करण्यासाठी डेटा, डिजिटल आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे हे आहे.

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change