Diesel On Fadelite स्मार्टवॉच भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमतीसह खासियत
Diesel On Fadelite (Photo Credits-Twitter)

Diesel ने भारतात त्यांचे शानदार स्मार्टवॉच Diesel On Fadelite लॉन्च केले आहे. या स्मार्टवॉचचे डिझाइन स्पोर्टी असून डायल याची राउंड मध्ये दिली आहे. मुख्य फिचर बद्दल बोलायचे झाल्यास Diesel On Fadelite स्मार्टवॉच क्वॉलकॉम  Snapdragon Wear 3100  प्रोसेसर लैस आहे. या व्यतिरिक्त युजर्सला या वॉचमध्ये एक्टिव्हिटी ट्रॅक करण्याची सुद्धा सुविधा दिली आहे. जसे हवामानाबद्दल ही माहिती दिली जाणार आहे. हे स्मार्टवॉच गुगल Wear ऑपरेटिंग सिस्टिमवर काम करणार आहे.(Skullcandy Crusher Evo हेडफोन भारतात लॉन्च, जाणून घ्या खासियत)

Diesel On Fadelite स्मार्टवॉचची  किंमत 21,995 रुपये आहे. हे वॉच ग्राहकांना Red to Balck, Black to Clear, Blue to Clear आणि Transpareny कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. हे. हे स्मार्टवॉच युजर्सला कंपनीच्या अधिकृत वेबसाईट किंवा रिटेल स्टोअर मधून खरेदी करता येणार आहे.

कंपनीने Diesel On Fadelite  स्मार्टवॉचसाठी  1.19 इंचाचा डिस्प्ले दिला आहे, ज्याची केस साइज 44m आहे, तसेच यामध्ये उत्तम परफॉर्मेन्ससाठी क्वॉलकॉम Snapdragon Wear 3100  प्रोसेसर, 512MB रॅम आणि 4GB इंटरनल  स्टोरेज दिला आहे. तर वॉच अॅन्ड्रॉइड 6.0 आणि iOS 10 वरील वर्जनवर काम करणार आहे.

Snapdragon Wear 3100 स्मार्टवॉचची खासियत म्हणजे यामध्ये एलईडी फ्लॅश लाईट दिली गेली आहे. त्याचसोबत वॉचमध्ये हार्ट रेट सेंसर, वायफाय, NFC आणि GPS  सारखे कनेक्टिव्हिटी फिचर्स ही मिळणार आहेत. या व्यतिरिक्त यामध्ये वॉच मध्ये कॉल मेसेज नोटिफिकेशन, वेदर अपडेट्स आणि म्युजिक कंट्रोल सारखे फिचर्स सपोर्ट मिळणार आहे. (Timex चा शानदार फिटनेस बँन्ड भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमतीसह फिचर्सबद्दल अधिक)

 दरम्यान, भारतीय बाजारात Diesel On Fadelite वॉचची  Garmin च्या Instinct Tactical Edition  सोबत टक्कर होणार आहे. Instinct Tactical Edition  च्या बॅटरी स्मार्टवॉच मोडमध्ये 14 दिवसांची बॅटरी लाईफ मिळणार आहे. तर जीपीएस मोड मध्ये 16 तासांची लाईफ आणि UltraTrac बॅटरी सेवर मोडमध्ये 40 तासांची बॅटरी लाईफ मिळणार आहे. खासियत म्हणजे युजर्सला आपल्या सर्व अॅक्टिव्हिटी यामध्ये रेकॉर्ड करता येणार आहेत.