Team India (Photo Credit - X)

Australia Men's National Cricket Team vs Indian National Cricket Team: ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ (IND vs AUS) यांच्यातील 5 सामन्यांचा बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2025 चा (Border-Gavaskar Trophy 2024-25) तिसरा सामना ब्रिस्बेन येथील गाबा (The Gabba, Brisbane) येथे खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा संघ तिसऱ्या दिवशी 117.1 षटकांत सर्वबाद 445 धावांवर आटोपला. ट्रॅव्हिस हेड आणि स्टीव्ह स्मिथ यांच्या शतकांच्या जोरावर यजमान संघाला ही धावसंख्या गाठण्यात यश आले. (हे देखील वाचा: Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहने गाबा कसोटीत घेतल्या 5 विकेट; मोडला कपिल देवचा विक्रम)

याशिवाय यष्टीरक्षक ॲलेक्स कॅरीने 70 धावा, उस्मान ख्वाजा 21 धावा, पॅट कमिन्स 20 धावा, मिचेल स्टार्क 18 धावा, नॅथन मॅकस्वीनी 9 धावा, मार्नस लॅबुशेन 12 धावा आणि मिचेल मार्शने 5 धावा केल्या. भारताकडून गोलंदाजी करताना जसप्रीत बुमराहने पुन्हा एकदा शानदार गोलंदाजी करत आपले पंजे उघडले. बुमराहने 28 षटकात 76 धावा देत 6 बळी घेतले. तर मोहम्मद सिराज, आकाश दीप आणि नितीश रेड्डी यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.

दरम्यान, केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल ही जोडी भारतीय डावाची सुरुवात करण्यासाठी आली, पण दुसऱ्याच चेंडूवर स्टार्कने जैस्वालची शिकार करून त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. यानंतर स्टार्कने तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर गिलला बाद करून भारताला दुसरा धक्का दिला. 8व्या षटकात भारताची तिसरी विकेट पडली, जोश हेझलवूडने विराट कोहलीला झेलबाद केले. लंच ब्रेक जाहीर झाला आहे.