IND vs BAN 2nd ODI 2024: बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ (Team India) कानपूरला (Kanpur) पोहोचला आहे. मंगळवारी भारतीय संघाचे कानपूरमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले. टीम इंडियाने पहिल्या कसोटीत बांगलादेशचा 280 धावांनी पराभव करून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली असून आता या मालिकेत बांगलादेशचा धुव्वा उडवण्याकडे टीम इंडियाची नजर असेल. कानपूरला पोहोचलेल्या भारतीय संघाचे स्वागत करण्यासाठी हॉटेलचे कर्मचारी उपस्थित होते. खेळाडूंचे स्वागत करण्यासाठी हॉटेलचे वरिष्ठ अधिकारीच पोहोचले. एका कर्मचाऱ्याने विराट कोहलीचे (Virat Kohli) पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले, तर दुसरा सदस्य हात मिळवण्यासाठी पुढे आला. दरम्यान, विराट कोहलीने त्याच्याशी हात मिळवला नाही आणि सांगितले की सर, माझे दोनच हात आहेत. असे बोलून किंग कोहली तेथून निघून गेला. कोहलीच्या एका हातात त्याची बॅग, फोन आणि वैयक्तिक वस्तू आणि दुसऱ्या हातात हॉटेल कर्मचाऱ्यांनी दिलेला फुलांचा गुच्छ असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. या कारणामुळे कोहलीने इतर कर्मचाऱ्यांशी हस्तांदोलन केले नाही.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)