India 1st Innings 445 all Out: भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना (IND vs ENG 3rd Test) शुक्रवारपासून राजकोटच्या निरंजन शाह स्टेडियमवर खेळवला जात आहे. या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता दिसली असून तिसऱ्या कसोटी सामन्यातही या सामन्याची अपेक्षा आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरूच आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत टीम इंडियाने 86 षटकात 5 गडी गमावून 326 धावा केल्या होत्या. याआधी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताचा पहिला डाव 445 धावांवर बाद झाला आहे. यादरम्यान, रोहित-जडेजाने शतके झळकावली आहे तर इंग्लडंकडून मार्क वुडने चार विकेट घेतल्या आहे.
3RD Test. WICKET! 130.5: Jasprit Bumrah 26(28) lbw Mark Wood,प्रथम फलंदाजी करताना भारताचा पहिला डाव 445 धावांवर बाद झाला आहे. यादरम्यान, रोहित-जडेजाने शतके झळकावली आहे तर इंग्लडंकडून मार्क वुडने चार विकेट घेतल्या आहे. India 445 all out https://t.co/FM0hVG5X8M #INDvENG @IDFCFIRSTBank
— BCCI (@BCCI) February 16, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)