IND vs SL 1st ODI: टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज ग्वाल्हेरमध्ये खेळला गेला. पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेचा 67 धावांनी पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 50 षटकांत 7 गडी गमावून 373 धावा केल्या. टीम इंडियाकडून अनुभवी फलंदाज विराट कोहलीने सर्वाधिक 113 धावा केल्या. श्रीलंकेकडून कसून राजिताने सर्वाधिक 3 बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ 50 षटकांत आठ गडी गमावून केवळ 306 धावा करू शकला. श्रीलंकेकडून कर्णधार दासुन शनाकाने सर्वाधिक नाबाद 108 धावा केल्या. टीम इंडियाकडून उमरान मलिकने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. या मालिकेतील पुढचा सामना 12 जानेवारीला कोलकाता येथे होणार आहे.
1ST ODI. India Won by 67 Run(s) https://t.co/MB6gfx9iRy #INDvSL @mastercardindia
— BCCI (@BCCI) January 10, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)