IND vs ENG 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यात गुरुवारपासून पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना (IND vs ENG 5th Test) आजपासून खेळवला जाणार आहे. या सामन्यात दोन्ही संघ धर्मशाळा (Dharamshala) येथे भारतीय वेळेनुसार सकाळी 9.30 वाजल्यापासून खेळायला सुरुवात करतील. टीम इंडिया सध्या मालिकेत 3-1 ने आघाडीवर आहे. आता रोहित शर्मा आणि कंपनीची नजर धर्मशाळा कसोटीवर आहे. दरम्यान, इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. त्याचवेळी देवदत्त पडिक्कल भारतासाठी पदार्पण करत आहे. रजत पाटीदारच्या जागी त्याचा प्लेइंग-11 मध्ये समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर रविचंद्रन अश्विनचा हा 100 वा सामना आहे.

दोन्ही संघांचे प्लेइंग-11

इंग्लंड : जॅक क्रोली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (सी), बेन फोक्स (विकेटकीपर), शोएब बशीर, टॉम हार्टले, मार्क वुड, जेम्स अँडरसन.

भारत : यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, सरफराज खान, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)