Maharashtra Political Crisis: पुढची रणनीती ठरवण्यासाठी वर्षा बंगल्यावर महत्वाची बैठक; अजित पवार, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण उपस्थित

राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी वर्षा बंगल्यावर एक मोठी बैठक पार पडत आहे.

Maharashtra Political Crisis: पुढची रणनीती ठरवण्यासाठी वर्षा बंगल्यावर महत्वाची बैठक; अजित पवार, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण उपस्थित
Uddhav Thackeray, Ajit Pawar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे बंड करून 35 आमदारांसह सुरतमध्ये असल्याची माहिती मिळत आहे. अहवालानुसार शिंदे यांनी शिवसेनेसमोर भाजपमध्ये सामील होण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. यावरून महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची स्थती निर्माण झाली आहे. अशात सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी वर्षा बंगल्यावर एक मोठी बैठक पार पडत आहे. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण असे महत्वाचे नेते उपस्थित आहेत. पुढची रणनीती ठरवण्यासाठी तीनही पक्षांचे नेते एकत्र आले आहेत. साधारण रात्री 8 वाजता शरद पवारदेखील यामध्ये सामील होणार आहेत.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 21, 2022 06:21 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).