Burj Khalifa Displayed Indian Flag: बुर्ज खलिफावरुन संयुक्त अरब अमिरातीने या स्वातंत्र्यदिनी पाकिस्तानला मोठा संदेश दिला आहे. या वर्षी बुर्ज खलिफावर पाकिस्तानचा ध्वज लावण्यात आला नाही. तर रात्री 12 वाजता बुर्ज खलिफा परिसर भारतीय तिरंग्याने उजळून निघाला. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये बुर्ज खलिफावर भारताचा तिरंगा दिसत आहे. या वर्षी दुबई, संयुक्त अरब अमिरातीमध्ये प्रसिद्ध बुर्ज खलिफाने स्वातंत्र्यदिनी मध्यरात्री आपला राष्ट्रध्वज प्रदर्शित न केल्याने शेकडो पाकिस्तानी निराश आणि संतप्त झाले आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)