Wayanad Landslide: काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी वायनाड भूस्खलनग्रस्तांसाठी मोठी घोषणा केली आहे. काल आम्ही घटनास्थळी गेलो होतो. आम्ही शिबिरांमध्ये गेलो, तेथील परिस्थितीचे आकलन केले. आज आम्ही प्रशासन आणि पंचायतीची बैठक घेतली.त्यांनी आम्हाला मृतांची संख्या, घरांचे नुकसान आणि त्यांची रणनीती याबद्दल माहिती दिली. आम्ही वायनाडला शक्य ती सर्व मदत करू. काँग्रेस परिवाराला येथे 100 हून अधिक घरे बांधायची आहेत. मला वाटतं केरळ सारखी एवढी शोकांतिका मी एकाही प्रदेशात पाहिली नाही. मी हे प्रकरण दिल्लीत मांडणार असून केरळच्या मुख्यमंत्र्यांशीही चर्चा करणार आहे. हेही वाचा: Wayanad Landslide Update: केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलन; बचावकार्यासाठी लष्कराचे 225 जवान तैनात, 45 जणांचा मृत्यू, 70 जखमी
VIDEO | Wayanad Landslides: "I have been here since yesterday. As I said yesterday, this is a terrible tragedy. We went to the site yesterday. We went to the camps, we assessed the situation there. Today, we had a meeting with the administration and the panchayat. They briefed us… pic.twitter.com/vG0KSjpL1O
— Press Trust of India (@PTI_News) August 2, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)