PM Modi Pays Tribute To Sardar Vallabhbhai Patel: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी गुजरातमधील केवडिया येथील स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. पटेल यांना सन्मानित केल्यानंतर, पंतप्रधानांनी एकतेची शपथ दिली आणि केवडिया येथील परेड ग्राउंडवर 'राष्ट्रीय एकता दिवस' परेड हजेरी लावली. तत्पूर्वी, पंतप्रधानांनी सोशल मीडिया साइटवर एका पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'राष्ट्राची एकता आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करणे हे त्यांच्या जीवनाचे सर्वोच्च प्राधान्य होते. त्यांचे व्यक्तिमत्व आणि कार्य देशातील प्रत्येक पिढीला प्रेरणा देत राहील.'

पंतप्रधान मोदींनी वाहिली सरदार वल्लभभाई पटेल यांना श्रद्धांजली -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)