कर्नाटक मध्ये मागील काही दिवसांपासून कॉलेजमध्ये हिजाब बंदीवरून वातावरण तापलं आहे. विद्यार्थ्यांचे दोन गट एकमेकांसमोर ठाकले असून त्याला हिंसक वळणही लागले आहे. याप्रकरणी आपली प्रतिक्रिया देताना मंत्री आदित्य ठाकरे यांनी शैक्षणिक संस्थांमध्ये लक्ष केवळ शिक्षणावर असावं, तिथे राजकीय, धार्मिक मुद्दे आणू नयेत असं म्हटलं आहे. जेव्हा शाळेत, कॉलेजमध्ये विशिष्ट युनिफॉर्म असतो तेव्हा तोच परिधान करावा असेही त्यांनी म्हटलं आहे.
ANI Tweet
Where there is a prescribed uniform in schools/colleges, it should be followed. Only education should be the focus at centers of education. Religious or political issues should not be brought to schools/colleges: Maharashtra Minister Aaditya Thackeray on Karnataka hijab row pic.twitter.com/eBFR7VIvh4
— ANI (@ANI) February 9, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)