Tiktok Star Vishnupriya Engagement: लोकप्रिय टिकटॉक स्टार विष्णुप्रिया नायर (Vishnupriya Nair) चा आज साईनाथ पाटील (Sainath Patil) याच्या बरोबर साखरपुडा पार पडला. विष्णुप्रियाने आपल्या इन्स्ट्राग्राम अकाऊंटवरून साखपुड्याचे फोटो शेअर केले आहेत. यात ती खूपचं सुंदर दिसत आहे. विष्णुप्रियाच्या साखरपुड्याच्या फोटोंवर चाहते कमेंट करत शुभेच्छा देत आहेत. Tik Tok मोबाईल अॅप इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या जगात खूप लोकप्रिय आहे. या अॅपद्वारे लोक संवाद किंवा गाणे फॉलो करून अभिनय करतात किंवा गाण्यावर डान्स करून त्यांचा व्हिडिओ शेअर करतात. टिक-टॉक या म्युझिकल अॅपने अनेकांना रातोरात स्टार बनवले आहे. विष्णुप्रिया नायर देखील टिक टॉकमधून स्टार बनलेल्या लोकांपैकी एक आहे. विष्णुप्रिया नायर ही औरंगाबाद येथील रहिवासी आहेत. विष्णुप्रियाचे टिक-टॉकवर 2.6 दशलक्ष पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.
विष्णुप्रिया नायर आणि साईनाथ पाटील साखरपुडा फोटोज आणि व्हिडिओज -
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)