मुंबई: कांदिवली येथे घराची भिंत कोसळली; सुदैवाने कोणतीही जिवीतहानी नाही
House Wall collapsed in Kandivali | (Photo Credits: Twitter)

मुंबई (Mumbai) मधील कांदिवली (Kandivali) येथे घराची भिंती कोसळल्याची दुर्घटना समोर आली आहे. रविवारी (10 मे) पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच  पोलिस, अग्निशमन दल आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची टीम घटनास्थळी पोहचली. त्यांनी बचाव कार्याला सुरुवात केली. त्यानंतर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 5 लोकांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले. NDRF च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेमध्ये कोणत्याही प्रकराची जिवीतहानी झाली नाही. या दुर्घटनेत घरातील 4-5 लोक ढिगाऱ्याखाली अडकले होते. यातून 3 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. त्यानंतर 2 लोकांना बाहेर काढण्यात यश आले.

कांदवली पश्चिम मधील दालजी पाडा (Dalji Pada) भागातील साबरीया मश्चिद (Sabria Masjid) जवळील G-1 हाऊसची भिंती कोसळली. ही घटना आज पहाटे 6 च्या सुमारास घडली. बचाव कार्य अजूनही सुरु आहे. G-1 हाऊसची भिंती अर्धवट कोसळली असल्याने आत लोकं अडकून राहिली आहेत, असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे.

ANI Tweet:

सध्या कोरोना व्हायरसचे संकट संपूर्ण देशावर आहे. त्यामुळे घेण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे लोकांपुढील आव्हानं वाढली आहेत. त्यात अशा प्रकारच्या दुर्घटना चिंता अधिकच वाढवतात.