Deputy Chief Minister Ajit Pawar | (Photo Credits : Facebook)

महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. राज्यात सर्वाधिक रुग्ण मुंबई (Mumbai) आणि पुणे (Pune) आढळून आले आहेत. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णाच्या संख्येत सकारात्मक बदल होत असताना आज मुंबईत 184 तर, पुण्यात 78 नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भितीजनक वातवरण निर्माण झाले आहे. यातच शहरातील कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागल्याने उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी चिंता व्यक्त केली आहे. तसेच पुण्यात एकही रुग्ण वाढता कामा नये, यासाठी आठ दिवस कडक लॉकडाउनशिवाय पर्याय नाही. पोलीस प्रशासनाने पाहिजे तर, कडक धोरण अवलंबावे. यासाठी नागरिक निश्चितच सहकार्य करतील, असे निर्देश अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार डॉ. अमोल कोल्हे, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्यासोबत अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत अजित पवार म्हणाले की, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील कन्टेंन्टमेंट झोन परिसरात कडक निर्बंध घालण्यात यावेत. या भागातील नागरिकांना वारंवार ये-जा करता येणार नाही. त्याचबरोबर या भागातील सार्वजनिक स्वच्छतागृहे आणि अन्य परिसरात स्वच्छेतेची विशेष दक्षता बाळगावी. येथील नागरिकांना फ्ल्यू सदृश लक्षणे आढळल्यास त्यांनी तात्काळ तपासणी करुन घेणे गरजेचे आहे, असे अजित पवार त्यावेळी म्हणाले आहेत. हे देखील वाचा- नागपूर: कोरोनावर मात करुन रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेल्या एका व्यक्तीला घराबाहेर पडणे चांगलेच भोवले

अजित पवार यांचे ट्वीट-

भारतात आतापर्यंत एकूण 14 हजार 792 कोरोना बाधीत आढळले आहेत. त्यांपैकी 448 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 2 हजार 015 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाबाधीतांची संख्या 3 हजार 648 वर पोहचली आहे. यात मुंबईत 184 तर, पुणे शहरात 78 नवे रुग्ण आढळून आले आहेत.