अशोक चव्हाण (Photo Credit: PTI)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संपूर्ण जगात थैमान घातले आहे. सध्या भारतातही कोरोनोबाधीत रुग्णांच्या आकड्यात वाढ होऊ लागली आहे. भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात (Maharashtra) अधिक रुग्ण आढळले आहेत. दरम्यान कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारताने जगाशी संबंध तोडले आहेत. एवढेच नव्हेतर, कोरोना विषाणुमुळे भारतात येणारे सर्व आंतराष्ट्रीय उड्डाणे रद्द झाली आहे. यातच महाराष्ट्रातील नांदेड (Nanded) शहरातील 6 विद्यार्थी मॉरिशसमध्ये (Mauritius) अडकून पडल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित विद्यार्थ्यांची मदत करण्यात यावी, यासाठी काँग्रेस नेते अशोक चव्हान (Ashok Chavan) यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र लिहले आहे. संबंधित विद्यार्थी इंटर्नशिप करण्यासाठी मॉरिशस येथे गेले होते. येत्या 25 मार्च रोजी त्यांच्या व्हिसा संपणार असून ते आजच भारतात परतणार होते. परंतु, विमानसेवाच रद्द झाल्याने ते मॉरिशसमध्ये अडकून पडले आहेत.

संकेत पानपट्टे, ऋतुज माने, अनिरूद्ध कुलकर्णी, गौरव देशपांडे, अमरदीप जगताप आणि शंकर नादरे असे या विद्यार्थ्यांचे नाव आहे. हे सर्व विद्यार्थी नांदेड शहरातील रहिवासी आहेत. तसेच हे सर्वजण हॉटेल मॅनेजमेंटचे विद्यार्थी असून गेल्या चार महिन्यापूर्व इंटर्नशिपसाठी मॉरिशसला गेले होते. परंतु, भारतावर कोरोना व्हायरसचे संकट उद्धभवल्यानंतर देशाने परदेशातून येणारी विमानसेवा पूर्णबंद केली आहे. विमाने रद्द होत असताना विद्यार्थ्यांनी परतीच्या तिकिटासंदर्भात संबंधित विमान कंपन्यांशी सुद्धा संपर्क साधला, मात्र तिथेही ठोस उत्तर मिळाले नसल्याची त्यांची तक्रार आहे. दरम्यान, त्यांना कुठूनच प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी अखेर सार्वजनिक बांधकाम मंत्री व नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हान यांच्याशी संपर्क साधला. याची दखल घेत अशोक चव्हान यांनी मुख्यमंत्री यांना पत्र लिहले आहे. राज्य सरकारने देखील हा प्रश्न गांभिर्याने घेतला असून, सदर 6 विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. हे देखील वाचा- Coronavirus Test in Mumbai:घरबसल्या COVID 19 ची चाचणी करण्यासाठी ICMR ने दिली खाजगी लॅब्सला परवानगी; इथे पहा Diagnostic Centres ची नावं आणि नंबर

चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना व्हायरसने इटली, इराण आणि स्पेनसह भारतातही धुमाकूळ घातला आहे. इतर देशाच्या तुलनेत भारतात मृतांची संख्या कमी असली तरीदेखील हा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारतात कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 500 अधिक लोकांना याची लागण झाली आहे. सध्या केंद्र आणि राज्य सरकारकडून कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य ती काळजी घेतली जात आहे.