Image Used For Representation (Photo Credits: Facebook)

Nagpur Schools Reopens: राज्यातील काही ठिकाणी उद्यापासून शाळा सुरु होणार आहेत. मात्र शाळा सुरु होण्यापूर्वी कोरोनाच्या नियम आणि अटींचे पालन करावे असे आवाहन राज्य सरकार कडून करण्यात आले आहे. तर मुंबई, पुणे आणि ठाणे वगळता राज्यातील विविध जिल्ह्यात शाळा सुरु करण्यात येणार आहेत. याच पार्श्वभुमीवर नागपूरात येत्या 26 नोव्हेंबर पासून इयत्ता 9 वी ते 12 चे वर्ग सुरु होणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबद्दल नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजर यांनी अधिक स्पष्ट केले आहे.

कुंभेजकर यांनी पुढे असे ही म्हटले आहे की, शाळांचा अवधी हा फक्त चार तासांचा असणार आहे. त्यामुळे अनावश्यक गर्दी टाळण्याच्या दृष्टीकोनातून 9 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या वेळेनुसार शाळेत बोलावले जाणार आहे. त्याचसोबत जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी  शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पाल्यांना शाळेत सोडायला येणाऱ्यांना सॅनिटायझर, मास्क आणि सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे पालन करावे अशा सुचना दिल्या आहेत.(Schools Reopen in Maharashtra: राज्यातील विविध जिल्ह्यातील शिक्षकांना कोरोनाची लागण, शाळा सुरु करण्याबद्दल प्रश्नचिन्ह)

मात्र दुसऱ्या बाजूला विविध जिल्ह्यातील शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पालकांसह विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याबद्दल चिंता व्यक्त करत आहेत. तसेच मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने पुन्हा एकदा शाळा सुरु करण्याबद्दल स्थगिती द्यावी अशी मागणी केली जात आहे. कारण शाळा सुरु केल्यास कोरोनाची लागण होऊ शकते असा सुद्धा सवाल उपस्थितीत केला जात असल्याने या निर्णयावर विचार करावा असे ही म्हटले जात आहे. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातूनच अभ्यास आणि शाळा सुरु ठेवण्यात याव्यात असे ही म्हटले जात आहे.