Mission Begin Again अंतर्गत 5 ऑगस्ट पासून मुंबई मध्ये नेमकं काय सुरु राहणार, काय बंद? घ्या जाणून
Unlock 3 (Photo Credits: File Image)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्गाची साखळी तोडण्यासाठी मार्च महिन्यापासून देशव्यापी लॉकडाऊनला (Lockdown) सुरुवात झाली. हा लॉकडाऊन मे महिन्यापर्यंत अत्यंत कडक होता. दरम्यान जूनच्या पहिल्या आठवड्यापासून अनलॉकिंगला सुरुवात झाली. अनलॉकच्या दोन टप्प्यात काही सेवा सुविधांना मुभा देण्यात आली. आता देखील राज्यातील लॉकडाऊन 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आला असला तरी 'मिशन बिगेन अगेन' (Mission Begin Again) अंतर्गत काही नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. 5 ऑगस्ट पासून हे नवे नियम लागू करण्यात येणार आहेत. या नव्या नियमांमुळे काही सोयी-सुविधा पुन्हा सुरु होणार आहेत. तर अनलॉक 3 च्या माध्यमातून मुंबईत नेमके काय सुरु राहणार आणि काय बंद याची माहिती घेऊया... (मुंबई शहरात येत्या 5 ऑगस्टपासून सर्व दुकाने, मॉल्स सुरु; मद्यविक्रीस परवानगी, वेळही ठरली)

ANI Tweet:

काय सुरु राहणार?

# सर्व अत्यावश्यक सेवा सुरुच राहणार.

# दुतर्फा असलेली सर्व दुकाने सुरु.

# सर्व दुकानं सकाळी 9 ते संध्याकाळी 7 पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी.

# काऊंटरवरुन दारु विकण्यास परवानगी. होम डिलिव्हरी देखील सुरु राहणार.

# मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत सुरु राहणार.

# रेस्टॉरंट आणि हॉटेलच्या किचनसाठी परवानगी. होम डिलिव्हरीची सोय उपलब्ध.

# सर्व ई-कॉमर्स कामं

# सध्या सुरु असलेल्या सर्व कंपन्या

# सर्व बांधकाम कामं

#जीम, योगा सेंटर

# बगिचे आणि खेळाची मैदाने

# वाहनांचे गॅरेज

काय बंद राहणार?

# मॉलमधील थिएटर आणि रेस्टॉरंट

# स्विमिंग पूल्स

# शाळा

# महाविद्यालयं

तसंच सरकारी कार्यालयात 15% तर खाजगी कार्यालयात 10% कर्मचाऱ्यांच्या आधारावर कार्यरत  ठेवण्यात येणार आहेत. अनलॉक 3 च्या माध्यमातून अनेक सुविधा पुन्हा सुरु करण्यात आल्या असल्या तरी कोविड-19 चे संकट अद्याप टळलेले नाही. त्यामुळे खबरदारीच्या उपाययोजनांचे पालन करणे आवश्यक आहे.