Air India Express pilot Captain Deepak Sathe’s mortal remains reach Mumbai: केरळच्या कोझीकोडमध्ये झालेल्या विमान अपघातामध्ये मरण पावलेले वैमानिक दीपक साठे यांना एअर इंडियाकडून अखेरची मानवंदना

संपूर्ण भारत कोरोनाच्या संकटाशी लढत असताना केरळ येथील घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी दिवंगत दिपक साठे यांच्या नागपूर येथील निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियाची भेट घेतली होती.

Air India Express pilot Captain Deepak Sathe’s mortal remains reach Mumbai: केरळच्या कोझीकोडमध्ये झालेल्या विमान अपघातामध्ये मरण पावलेले वैमानिक दीपक साठे यांना एअर इंडियाकडून अखेरची मानवंदना

केरळमधील (Kerala) कोझिकोडच्या (Kozhikode) करीपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी रात्री एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाचा भीषण अपघात (Air India Express plane Crash) झाला. दुबईहून 191स ममन प्रवाशांना घेऊन आलेले एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान विमानतळावर उतरताना धावपट्टीवरून घसरले. या दुर्घटनेत मुंबईतील वैमानिक दीपक साठे (Deepak Sathe) यांच्यासह 18 जणांचा मृत्यू, तर 127 प्रवासी जखमी झाले आहे. दीपक साठे यांना अखेरची मानवंदना देण्यासाठी त्यांचे पार्थिव पार्थिव मुंबई एअरपोर्टवरील एअर इंडियाच्या कार्यालयात आणण्यात आले आहे.

दुबईहून 191 प्रवाशांना घेऊन आलेले एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान केरळमधील कोझिकोडच्या करीपूर विमानतळावर हे विमान रात्री 7. 41 वाजता उतरत असताना धावपट्टीवरून घसरले आणि खड्डयात कोसळले होते. हा अपघात एवढा भीषण होता की, विमानाचे दोन तुकडे झाले. विमानाने उतरताना धावपट्टी सोडली आणि ते कुंपणाच्या भिंतीवर आदळून 30 फुटी खड्ड्यात कोसळले. त्यामुळे त्याचे दोन तुकडे झाले. यात भयंकर अपघातात 18 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर, 127 जण जखमी झाले आहेत. हे देखील वाचा- Air India Express plane Crash: महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एअर इंडिया एक्स्प्रेस विमान अपघातात मरण पावलेले वैमानिक दीपक साठे यांच्या कुटुंबियाची घेतली भेट

एएनआयचे ट्वीट-

संपूर्ण भारत कोरोनाच्या संकटाशी लढत असताना केरळ येथील घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी दिवंगत दिपक साठे यांच्या नागपूर येथील निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियाची भेट घेतली होती.

(The above story first appeared on LatestLY on Aug 09, 2020 05:04 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).