Anil Deshmukh Tested Positive For COVID19: महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना (Coronavirus) अटोक्यात येत असल्याचे चित्र निर्माण झाले असताना एक महत्वाची माहिती समोर आली आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान, "आज माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे. तरी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे मी आवाहन करतो. लवकरच मी कोरोनावर मात करून पुन्हा आपल्या सेवेसाठी हजर होईल", असा आशायाचे ट्विट अनिल देशमुख यांनी केले आहे.
चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना संपूर्ण जगभरात धुमाकूळ घातला आहे. दरम्यान, सर्वसामन्य नागरिकांसह अनेक राजकीय नेते, कलाकार आणि खेळाडूदेखील कोरोनाच्या जाळ्यात अडकले आहेत. भारतात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येऊ लागली आहे. मात्र, कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नसून प्रत्येक नागरिकांनी लॉकडाऊनच्या निर्बंधांचे पालन करणे गरजेचे आहे. हे देखील वाचा-Narayan Rane: नारायण राणे म्हणाले 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहकार्य केले, कोणतीही आडकाठी आली नाही'
अनिल देशमुख यांचे ट्विट-
आज माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे. तरी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे मी आवाहन करतो. लवकरच मी कोरोनावर मात करून पुन्हा आपल्या सेवेसाठी हजर होईल.
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) February 5, 2021
महाराष्ट्रात गुरुवारी (4 फेब्रुवारी) 2 हजार 736 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर, 5 हजार 339 जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 19 लाख 48 हजार 674 कोरोनाबाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या राज्यात एकूण 34 हजार 862 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 95.71% झाले आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती.