कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण देशात हाहाकार माजवला आहे. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी देशात लॉकडाऊन (Lockdown) घोषीत करण्यात आला आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून ठोस पाऊले उचलली जात आहेत. तसेच कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी गरज नसल्यास घराबाहेर पडू नका, असे आवाहनही सरकारकडून वारंवार करण्यात येत आहे. दरम्यान, आता नागरिक अत्यावश्यक सेवा किंवा आपात्कालीन परिस्थितीत ई-पास (E-Pass) तयार करून प्रवास करून शकतात, अशी माहिती राज्य सरकारच्या संकेत स्थळावर देण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थितीत ई-पास कसा मिळवायचा? यासाठी खालील माहिती उपयोगी ठरणार आहे.
लॉकडाऊनच्या काळात ज्या नागरिकांकडे ई-पास असेल त्यांना पोलिसांकडून रस्त्यावर रोखण्यात येणार नाही. ज्या नागरिकांना महाराष्ट्र किंवा महाराष्ट्राबाहेर प्रवास करायचा असेल, त्यांना https://covid19.mhpolice.in या लिंकवर जाऊन ई-पाससाठी अर्ज करु शकतात. महत्वाचे म्हणजे, अत्यंत्य आपत्कालीन परिस्थितीत हे ई-पास देण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्य सरकारने दिली आहे. हे देखील वाचा- मुंबई: भरघाव कारची बसला जोरदार धडक; हॉटेल व्यवसायिकाच्या 18 वर्षीय मुलाचा मृत्यू
आपात्कालीन प्रवासासाठी ई-पास कसा मिळवायचा?
1)Covid19.mhpolice.in वर जा.
2)Apply for pass Here वर क्लिक करा.
3) सर्व तपशील योग्य पद्धतीने भरा व संबंधित कागदपत्रे जोडा.
4) Submit वर क्लिक करा, प्राप्त झालेला टोकन आयडी सेव्ह करुन ठेवा.
5)Covid19.mhpolice.in वर पासची स्थिती तपासू शकता आणि पास मजूर झाल्यावर तो डाउनलोड करू शकता.
ट्वीट-
महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राबाहेर आपत्कालीन परिस्थितीत प्रवास करायचा असेल तर https://t.co/bizm0WQ122 या लिंकवर जाऊन E-Pass साठी अर्ज करू शकता. लक्षात ठेवा, केवळ अत्यंत आपत्कालीन परिस्थितीतच हे E-Pass देण्यात येतील- @DGPMaharashtra ची माहिती pic.twitter.com/m7I6xpQMIT
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) May 13, 2020
महत्वाचे म्हणजे, संबंधित व्यक्तीने अर्ज केवळ इंग्रजीत भरणे गरजेचे आहे. तसेच सर्व कागदपत्रे एका फाईलमध्ये एकत्र करा आणि प्रवास करताना पासची हार्ड किंवा सॉफ्ट कॉपी आपल्या जवळ ठेवण्याची गरज आहे. याशिवाय नागरिकांनी पाससाठी एकापेक्षा अधिक वेळा अर्ज करू नये. तसेच टोकन आयची सेव्ह करायला विसरू नये आणि अधिकृतते शिवाय वैधते पलीकडे पास वापरू नका.