Leopard Cub found in Nagpur : नागपुरात वाहनाच्या धडकेत बिबट्याचे पिल्लू जखमी; पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू
snow leopards | Representational Image (Photo Credits: Pixabay)

injured Leopard cub found in Nagpur : नागपुरमध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचे पिल्लू गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती समोर आली ( Leopard cub hit by vehicle)आहे. ही घटना सोमवारी (दि. 4 मार्च) संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान ( Dhapewada Savner Road ) धापेवाडा सावनेर रोडवरून एक किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्गावर ( Leopard cub injured ) घडली.  यात बिबट्याचे पिल्लू गंभीररित्या जखमी झाले आहे. सध्या त्याला वन अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. हेही वाचा: Leopard Attacks Dog In Pune: बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, घरातल्यांची धावपळ; पुणे जिल्ह्यातील शिरुर येथील घटना सीसीटीव्हीत कैद (Watch Video)

जखमी अवस्थेत संध्याकाळी बिबट्याचे पिल्लू रस्त्यावर ये-जा करत होते. तिथल्या स्थानिक नागरिकांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी उपचारांसाठी प्रयत्न सुरू केले. एका सामाजिक कार्यकर्त्याने याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी धाव घेत, बिबट्याला पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. "बिबट्याच्या पिल्लाला चारचाकी वाहनाने धडक दिली, परिणामी या अपघातात तो गंभीर जखमी झाला," असे वनविभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले.  हेही वाचा: Dhule Leopard Rescue: बिबट्याची मान अडकली हंड्यात, अथक प्रयत्नाअंती सुटका

दरम्यान, ही घटना सोमवारी ( दि. ४ ) संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान घडली. मात्र, जखमी बिबट्याच्या पिल्लावर मंगळवारी सकाळी उपचार सुरू झाले. स्थानिकांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना वारंवार फोन करूनही रेस्क्यू पथक वेळेवर घटनास्थळी दाखल झाले नव्हते. रेस्क्यू पथकाकडून झालेल्या दिरंगाईमुळे स्थानिक नागरिकांनी काही काळ रोष व्यक्त केला होता.